नागपूरातून उपचार घेऊन गावाकडे परतणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी

58
नागपूरातून उपचार घेऊन गावाकडे परतणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी

नागपूरातून उपचार घेऊन गावाकडे परतणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी

नागपूरातून उपचार घेऊन गावाकडे परतणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847 📞

भंडारा : नागपूरच्या रुग्णालयात कॅन्सरच्या उपचारासाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रक्कम असा ६५ हजार रुपयांचा ऐवज प्रवासादरम्यान चोरीस गेल्याचा प्रकार घडला. आधीच आजारपणामुळे दु:खात असलेल्या या महिलेवर या चोरीच्या प्रसंगामुळे मोठे संकटच कोसळले आहे. ही घटना लाखनी बसस्थानकावर शिनवारी घडली. रेखा तेजराम झोडे वय ५७ वर्षे, बोदरा (देऊळगाव) ता.अर्जुनी/मोर) असे या महिलेचे नाव असून ती आपला मुलगा मिथुन याच्यासह भंडारा बसस्थानकावरून साकोलीकडे जाण्यास निघाली होती. या प्रवासादरम्यान हा प्रकार तिच्या लक्षात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातून उपचार घेऊन ही महिला परतीच्या प्रवासात भंडारा बसस्टॉपवरून जाण्यासाठी साकोली आगाराची बस क्रमांक एम. एच.४० वाय.५३९६ मध्ये साकोलीला जाण्यासाठी मुलासह निघाली होती. दरम्यान तिकीट काढण्यासाठी तिने आपली पर्स पाहिली असता चेन उघडी दिसली. पर्स पाहिली असता पर्समधील १० ग्रॅमचे सोन्याचे मनी, ३ ग्रॅम लॉकेट व एक हजार रुपये असा एकूण रोख रकमेसह ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले.
पोलिसांनी प्रवाशांची तपासणी केल्यावर कुणाकडेही चोरीचा ऐवज आढळला नाही. यावरून बसमध्ये चोरी झाली नसून भंडारा बसस्थानक किंवा बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. लाखनी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
*महिलेची रडारड पाहुण बस चालकाने पोलीस ठाण्यात पोहचवली बस*
आपल्या दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात येताच महिलेने रडारड सुरू केली. यामुळे बसचालक आशिष धुर्वे व वाहक सहादेव केवट यांनी बस थेट लाखनी पोलीस ठाण्यात नेली. पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांना घटनेची माहिती दिल्यावर महिला पोलीस कर्मचारी योगिता सिंगनजुडे , मनिषा खेडीकर, प्रगती वैद्य, सुनील शरजारे, यांनी बसमधील प्रवाशांची अंग झडती व सामानाची तपासणी केली. मात्र चोरी गेलेला मुद्देमाल मिळाला नाही.