५१२ चौरस फुटात भव्य प्रभु श्री रामाचे चित्र काढून शुभम भेकरेचे विक्रमाकडे वाटचाल
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :–संतोष उध्दरकर.म्हसळा तालुक्यातील अति दुर्गम भागात वसलेले छोटे खेडेगाव म्हणजे मौजे जांभुळ गाव. या गावातील एक सुशिक्षित तरुण शुभम भेकरे वय वर्षे १९ असुन त्याने न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे, विश्वामध्ये ज्या गोष्टीची चर्चा होत आहे ते म्हणजे २२ जानेवारी रोजी प्रभु श्री राम मंदिराचे भव्य उदघाटन, याच अनुशंगाने शुभम याने जांभुळ गावात शाळेच्या पटांगणात ५१२ चौरस फुटात भव्य श्री रामाचे चित्र काढले आहे. हे चित्र बनविण्यासाठी ५४० कोरे पेपर वापरण्यात आले व चारकोलच्या सहाय्याने हे भव्य चित्र काढले आहे व हे चित्र काढण्यासाठी शुभमला सलग ५०० तास लागले आहेत. कोणतेही आर्थिक सहाय्य नसताना स्वखर्चाने शुभमने हे चित्र काढले व या साठी शुभमने खूप मेहनत घेतली आहे. हे भव्य चित्र काढून विश्वविक्रम ठरणार असे शुभमचे ठाम मत आहे. कारण या अगोदर ५०९ चौरस फुटात चित्र काढण्यात आले होते पण माझे चित्र ५१२ चौरस फुटामध्ये आहे. या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील भव्य चित्र काढले होते. मी विविध प्रकारचे चित्र काढले आहेत व तालुक्यात किंवा जिल्ह्यात चित्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्याचा हेतु आहे पण त्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे असे आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना शुभमने सांगितले. शुभमला लहानपणापासून चित्र काढण्याची आवड आहे, या अगोदर त्याने डाळ, तांदूळ, बिस्किट, वर्तमान पत्र, अशा प्रकारे चित्र काढली आहेत असे त्याच्या घरातील सदस्य यांनी सांगितले.या वेगळ्या विक्रमाची संपूर्ण म्हसळा तालुक्यात चर्चा होऊन शुभमला सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. श्री रविप्रभा मित्र संस्था या साठी पुढाकार घेऊन लवकरच शुभमचे स्वप्न पूर्ण करणार असे संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड यांनी सांगितले.