स्व. गंगाराम शेडगे यांच्या स्मरणार्थ कुंभारआली पहेल येथे प्रवेशद्वारचे उदघाट्न उत्सहात संपन्न…
✍️सचिन पवार 👍
मीडिया वार्ता न्यूज
📞8080092301📞
माणगांव :-माणगांव तालुक्यातील पहेल यां गावी श्री. प्रशांत गंगाराम शेडगे यांचे वडील स्व. गंगाराम केरू शेडगे यांच्या स्मरणार्थ आज दि.9 जानेवारी रोजी कुंभारआली पहेल यां ठिकाणी आपल्या बाबाची आठवन म्हणून प्रवेशद्वाराचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी पहेल गावचे ग्रामस्थ गणपत शेडगे, धोंडू कुंभार,हरीदास खराडे, हारदास शेडगे, प्रदीप शेडगे केशव मांजरे, मारुती मांजरे ,पप्पू सावंत, समीर केसरकर ,राकेश खराडे, तानाजी खराडे ,महेश खराडे ,बिंदास खराडे ,विठ्ठल शेडगे, महेश वाघोस्कर, केरू शेडगे ,मोहन शेडगे ,समीर शेडगे, राजा शेडगे व उपस्थित होते.
माणगांव तालुक्यातील पहेल गावचे होतकरू कष्टाळू प्रशांतजी शेंडगे यांचे वडील गंगाराम शेंडगे यांच गेल्या वर्षी माणगांव येथील लोणेरे जवळील रेपोली यां गावाजवळ अपघातात निधन झालं होत. गंगाराम शेडगे हे गावातील समस्त नागरिकांसाठी कोणत्याही गोष्टीला गरजू व्यक्तीसाठी मदतीसाठी धावत असत यांच्या यां गोष्टीचा विचार करून ग्रामस्थ मंडळानी आठवण म्हणून पहेल गावातील कुंभारआली यां मुख्य नाक्यावर त्याच्या स्मरणार्थ प्रवेशद्वाराच उदघाटन करण्यात आलं आहे.