करुणा शर्मापासून दोन मुलं, धनंजय मुंडे यांच्या पोस्टमधील 8 मोठे गौप्यस्फोट.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्टमध्ये आठ मोठे गौप्यस्फोट केलेत.

अशोक शाही प्रतिनिधी

मुंबईः- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. धनंजय मुंडेंच्या एका नातेवाईक महिलेनं ओशिवारा पोलीस ठाण्यात ही तक्रार दिलीय. या सगळ्या प्रकरणावर खुद्द राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत खुलासा केलाय. धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्टमध्ये आठ मोठे गौप्यस्फोट केलेत.

धनंजय मुंडेंचे आठ मोठे खुलासे

1) रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्ख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे.

2) करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली.

3) सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

4) सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत.

5) 2019 पासून करुणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.

6) सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्माविरुद्ध याचिका दाखल केली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत आणि खासगी साहित्य प्रकाशित केले होते.

7) या सर्व तक्रारी खोट्या आहेत, आणि करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे.

8) माझ्याकडे रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे sms रुपी पुरावे आहेत. तसेच मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे, यासाठीच्या दबावतंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here