मकर संक्रांती निमित्ताने विश्वकर्मा म्हसळा तालुका सुतार समाज यांच्या कडून तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम

58

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

कोकण :-म्हसळा प्रतिनिधी-संतोष उध्दरकर. म्हसळा तालुक्यातील विश्वकर्मा म्हसळा तालुका सुतार समाज यांच्या कडून तालुक्यातील समस्त समाजबांधव यांना तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा प्रकारे शुभेच्छा देऊन गळाभेट करण्यात आली. या निमित्ताने तालुक्यातील समस्त समाजबांधव एकत्र येऊन वर्षभरात मिटींगच्या माध्यमातून घेण्यात येणारे विषय व फेब्रुवारी महिन्यात येणारी विश्वकर्मा जयंती कशा पद्धतीने साजरी करणार या विषयावर चर्चा करून याचे आयोजन करण्यात आले. या वेळी समाजाचे अध्यक्ष दत्ता सुतार यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या व आशाच प्रकारे आपला सुतार समाज एकत्र येऊन समाजाला सहकार्य करावे व सगळ्यांनी संघटीत होणे आवश्यक आहे असे देखील दत्ता सुतार यांनी आपल्या मनोगतात सांगितले. या वेळी अध्यक्ष दत्ता सुतार, माझी अध्यक्ष पांडुरंग सुतार, नामदेव सुतार, जेष्ठ कार्यकर्ते दत्तात्रेय उध्दरकर, नथुराम सुतार, जनार्दन सुतार, सेक्रेटरी राजु सुतार,सहसरचिटणीस संतोष उध्दरकर,सुहास सुतार, सचिन सुतार, तसेच तालुक्यातील सर्व सुतार बांधव उपस्थित होते.