मौजा मिनघरी पं स . सिदेवाही जि.चंद्रपर येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचा उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले_…

69
मौजा मिनघरी पं स . सिदेवाही जि.चंद्रपर येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचा उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले_...

मौजा मिनघरी पं स . सिदेवाही जि.चंद्रपर येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचा उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले_…

मौजा मिनघरी पं स . सिदेवाही जि.चंद्रपर येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचा उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले_...

अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि

शिंदेवाही:- देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी जी यांनी १५ नोव्हेंबर २०२३ ला भगवान बिरसा मुंडा यांच्या गौरव दिनाचे औचित्य साधून विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभाची सुरुवात केली.
या निमित्याने आज दिं,१८ जानेवारी २०२४ ला मौजा-मिनघरी पं.स.शिंदेवाहीच्या वतीने आपला संकल्प विकसित भारत यात्रेचा उद्घाटन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आला.
या आपला संकल्प विकसित भारत यात्रेच्या निमित्ताने खासदार अशोक नेते यांनी बोलतांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधुन या यात्रेचा शुभारंभ केला.नववर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकारने घेतलेलेे ऐतिहासिक निर्णय व अनेक लोकाउपयोगी, लोकहिताचे,लोककल्याणासाठी केलेल्या कार्यान्वित केंद्र शासनाच्या विविध योजना थेट जनतेपर्यंत पोहचवुन ज्यांना आतापर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही.अशांना या माध्यमातून सदर केंद्र शासनाच्या योजनांची थेट माहिती व लाभार्थ्यापर्यंत व जनतेपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रकारचं माध्यम आहे.यात ३५०० हून अधिक वनधन विकास केंद्र,२०२६ पर्यत ७४० एकलव्य विद्यालय सुरू करण्याचे ध्येय, आदिवासी समुदायाचे सक्षमीकरणात १.१ लाख कोटी ची तरतूद, वन अधिकार अधिनियम, पीएम किसान सन्माननिधी अंतर्गत १ कोटी आदिवासी परिवारांना लाभ यात अनेक योजनांचा समावेश असून विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. असे प्रतिपादन या यात्रेच्या शुभारंभाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

पुढे बोलतांना खा.नेते म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांनी मंदिर स्वच्छतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्याने आपण दिवाळी सारखा सण साजरा करावा. प्रत्येकांनी आपल्याला घरोघरी दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा.असे व्यक्त यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले.

याप्रसंगी भारत आयुष्यमान भव अशा विविध योजनाचे प्रमाणपत्राचे व संकल्प यात्रा दिनदर्शिकाचे वितरण खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते,माजी सभापती नागराज गेडाम,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष कमलाकर शिद्दमशेटीवार, तहसिलदार संदिप पानमंद, थानेदार चव्हाण साहेब,गट संवर्ग अधिकारी अक्षय सुकरे, शिक्षणाधिकारी किशोर पिसे, सरपंच शुभांगीताई आत्राम, उपसरपंच विनीत दहिवले,किशोर गायकवाड,लखन नन्ऩ़ावरे, देवागणा मोहूरले,उतरा गुरूनूले, हिवराज बोरकर,प्रियंका बोरकर, निता धारणे,मुरलीधर मडावी, प्रिया खंडारे,संताश लहोट, विशाखा शेंडे तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक बंधू भगिनीं,आशा वर्कर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थिती होते.