रायगड जिल्हा पोलीस दलातर्फेसायबर सुरक्षा जनजागृती अभियान

58
रायगड जिल्हा पोलीस दलातर्फेसायबर सुरक्षा जनजागृती अभियान

रायगड जिल्हा पोलीस दलातर्फेसायबर सुरक्षा जनजागृती अभियान

रायगड जिल्हा पोलीस दलातर्फेसायबर सुरक्षा जनजागृती अभियान

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

अलिबाग;-भविष्यात सायबर गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ याचा विचार करून कॉलेज, शाळा मध्ये शिकणारे मुलांमध्ये सायबर सुरक्षा तसेच ऑनलाईन फसवणूक, मोबाईल वापरण्याचे फायदे तोटे, इंटरनेट चा वापर असे गुन्हेहोऊन नये याकरिता खालील नमूद कॉलेज,शाळा याठिकाणी रायगड पोलीस दलाकडून सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
क्र. दिनांक कार्यक्रमाचे नाव शाळा/कॉलेज नावे उपस्थितीत शिक्षक व विध्यार्थी
१ ०८/१२/२०२३ सायबर जागरूकता सुंदरराव मोरे कॉलेज,चोळई ता.पोलादपूर ८३
२ ०८/१२/२०२३ सायबर जागरूकता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर ,पोलादपूर २३७
३ ०९/१२/२०२३ सायबर जागरूकता डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज,महाड १४७
४ ०९/१२/२०२३ सायबर जागरूकता गं.द.आंबेकर व चं.ग.मेहता ज्यू.कॉलेज बिरवाडी ३०८
५ ०९/१२/२०२३ सायबर जागरूकता हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट विद्यामंदिर ,महाड १०६
६ ११/१२/२०२३ सायबर जागरूकता द.ग.तटकरे महाविद्यालय ता.माणगाव २०४
७ ११/१२/२०२३ सायबर जागरूकता एन.एम.जोशी विद्याभवन राजाभाऊ मोने कॉलेज, गोरगाव ९३
८ १२/१२/२०२३ सायबर जागरूकता वसंत नाईक महाविद्यालय , म्हसळा १७९
९ १२/१२/२०२३ सायबर जागरूकता न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु कोलेज म्हसळा ३०७
१० १३/१२/२०२३ सायबर जागरूकता अंजुमन इस्लाम जंजिरा, ज्यू कॉलेज श्रीवर्धन ६७
११ १३/१२/२०२३ सायबर जागरूकता महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय ,श्रीवर्धन ५३
१२ १३/१२/२०२३ सायबर जागरूकता डॉ.ए.आर.उंदरे वुमेन्स डिग्री कॉलेज,बोर्ली पंचायत ७३
१३ १४/१२/२०२३ सायबर जागरूकता द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय ,तळा १८७
१४ १४/१२/२०२३ सायबर जागरूकता जे.एम.राठी इंग्लिश स्कूल व ज्यु.कॉलेज, रोहा ११६
१५ १५/१२/२०२३ सायबर जागरूकता द.ग.तटकरे माध्य व उच्च माध्यमिक ज्यु.कॉलेज, कोलाड ४१०
१६ १५/१२/२०२३ सायबर जागरूकता को.ए.सो.डॉ.सी.डी देशमुख महाविद्यालय ,रोहा २२५
१७ १८/१२/२०२३ सायबर जागरूकता जनता विद्यालय ,मोहपाडा ,खालापूर १५२
१८ १८/१२/२०२३ सायबर जागरूकता एच.ओ.सी.पिल्लई कॉलेज,रसायनी २३४
१९ २१/१२/२०२३ सायबर जागरूकता वसंत देशमुख मेमोरियल शाळा व ज्यु.कॉलेज १६४
२० ०९/०१/२०२४ सायबर जागरूकता मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस कॉलेज १४०
२१ ११/०१/२०२४ सायबर जागरूकता कोकण ज्ञानपीठ ज्यु.आणि सिनीअर कॉलेज, कर्जत २२६
२२ ११/०१/२०२४ सायबर जागरूकता अभिनव शाळा व ज्यु.कॉलेज १३९
२३ १३/०१/२०२४ सायबर जागरूकता अंजुमन इस्लाम सिनियर व ज्युनिअर कोलेज, मुरुड ९३
२४ १६/०१/२०२४ सायबर जागरूकता जे.एस.एम.कॉलेज अलिबाग १८०
वरील प्रमाणे सायबर जागरूकता अभियान घेवून मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
तसेच दिनांक १६/०१/२०२४ रोजी दुपारी १२.३० ते २.१५ वाजता जनता शिक्षण मंडळ अॅड.दत्ता पाटील विधी महाविद्यालय आणि जे.एस.एम.विद्यालय यातील १८० विद्यार्थ्यांना रायगड पोलीस आणि एम.के.सी.एल.यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती अभियानच्या समारोप समारंभाचे वेळी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री.सोमनाथ घार्गे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये भविष्यात सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ आणि आव्हाने याबाबत चिंता व्यक्त केली. विद्यार्थी यांनी मोबाईल फोनचा योग्य वापर करून सायबर सुरक्षा स्वत:ची कशी करावी. तसेच न घाबरता पोलीस ठाणे येथे तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.