राजीव नगर वसाहतीच्या विकासासाठी खासदारांना निवेदन
ज्ञानेश्वर तूपसुंदर
तालुका प्रतिनिधी नाशिक
दि :२०(नाशिक) पाच ते सात हजार लोकसंख्यांनी गजबजलेल्या प्रभाग क्रमांक 30 राजीवनगर वसाहतीमध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या ड्रेनेज चेकअप मुळे वस्तीमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे, सिमेंट काँक्रीट रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी साचून रहिवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत, वसाहती अंतर्गत पथदीप बंद असून अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. ह्या समस्या सोडवण्यासाठी आनंद सामाजिक मित्र मंडळ अध्यक्ष गणेश तुपसुंदर व सनी रोकडे, वसंत वाकळे, शिवाजी शिंदे, अशोक वाव्हळ, अर्जुन जाधव, वशिष्ठ घोडके, उत्तम लोखंडे, दिनकर गायकवाड, दिलीप रणखांबे, बाळू झिने, देविदास साळवे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन दिले. या निवेदनात वसाहत मधील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट करणे, ड्रेनेज लाईन मोठी करणे, अंतर्गत पथदीप दुरुस्त करणे, सुरक्षा खातिर सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, तसेच राजीव नगर वसाहती मधील घरांना घरपट्टी लागू करणे अशा समस्यांचा समावेश आहे.