शिक्षकांनी केला माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित अधिकारी यांचा गुणगौरव सोहळा साजरा!

22
शिक्षकांनी केला माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित अधिकारी यांचा गुणगौरव सोहळा साजरा!

शिक्षकांनी केला माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित अधिकारी यांचा गुणगौरव सोहळा साजरा!

शिक्षकांनी केला माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित अधिकारी यांचा गुणगौरव सोहळा साजरा!

अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही/लाडबोरी : शिक्षक विध्यार्ध्याच्या जीवनात यशा चे रंग भरणार, विध्यार्थना घडविण्यासाठी आपल्या जीवाचं रान करीत असतात, या मध्ये काही विध्यार्थी आकाशाएवढं यश संपादन करतात विध्यार्थ्यांनी आकाशाला गवसनी घालत यश संपादन केले पुढील साठी व विध्यार्थी साठी आदर्श ठरवा व त्या मधून प्रेरणा मिळावी
म्हणून मौजा लाडबोरी मधील जिल्हा परिषद उच्च प्राथ शाळा व शाळा व्यवस्थापन समिती लाडबोरी, भीम आर्मी संघटना सिंदेवाही यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा मधील माजी विध्यार्थी व आजची नवनिर्वाचित अधिकारी कु.एकता प्रदीपजी नागदेवते याचा शाळेच्या प्रांगणात गुण गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते, जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षक हे विध्यार्थ्यांचा पाया मजबूत करीत असतात,आणी पाया मजबूत झाल्याने पुढे भक्कम पणे विध्यार्थी यश संपादन करतात,एकता चे शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद शाळेत झाले,हे इथ नमूद करावस वाटत,आपल्या शाळेत शिकून मोठी अधिकारी झाल्याने शाळेतील शिक्षकवृदानी आपल्या माजी विध्यार्थीचा गुण गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित केला , या समारंभाला अध्यक्ष म्हणून डॉ विनोद नागदेवते, व तुमराम सर ( नायब तहसीलदार सिंदेवाही )हे होते, उदघाटक म्हणून सालकर सर ( वन परीक्षेत्र अधिकारी प्रादे सिंदेवाही )विशेष अतिथी स्वप्नील कावळे ( नगराध्यक्ष सिंदेवाही) चंद्रकांत दलाल( म.न.रे.गा) बावनकर सर ( शिक्षण विस्तार अधिकारी) संतोष कुंटावार (केंद्र प्रमुख गडबोरी) घनश्याम मांदाळे सर (मुख्याध्यापक) अक्षय चहांदे, तेजस वानखेडे, शंकर चिलबुले मंचावर विराजमान होते,सर्व प्रथम माजी विध्यार्थी एकता नागदेवते व पाहुण्यांना ढोल पथक व लेझीम च्या वाद्यात स्वागत करीत त्याना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले,व स्वागत म्हणून विध्यार्थ्यानी फुलांचा वर्षाव केला,सर्व पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर मंचावरील पाहुण्यांनी विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण होईल या बाबत सविस्तर माहिती दिली,नंतर एकता नागदेवते यांचा भीम आर्मी संघटना च्या माध्यमातून शाल व ट्राफी देऊन एकता नागदेवते चा गौरव केला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वसाके मॅडम तर आभार प्रदर्शन जितेंद्र गुरुनुले सर यांनी केले हा कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरिता ठाकरे मॅडम राहंगडाले सर यांनी सहकार्य केले