भरधाव टिप्परची राजीव गांधी चौकात दुचाकीला धडक , भाऊ गंभीर जखमी , गरोदर महिला ठार.

61
भरधाव टिप्परची राजीव गांधी चौकात दुचाकीला धडक , भाऊ गंभीर जखमी , गरोदर महिला ठार.

भरधाव टिप्परची राजीव गांधी चौकात दुचाकीला धडक , भाऊ गंभीर जखमी , गरोदर महिला ठार.

भरधाव टिप्परची राजीव गांधी चौकात दुचाकीला धडक , भाऊ गंभीर जखमी , गरोदर महिला ठार.

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी भंडारा शहरातील वर्दळीचा चौक असलेल्या राजीव गांधी चौकात दुचाकीवरून जाणाऱ्या बहीण भावाला भरधाव टिप्परची धडक बसली. यात अफसाना शेख वय ३५ वर्षे या गरोदर महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ कलीम शेख वय ४० वर्षे यांच्या पायाला जबर दुखापत झाली. तर त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघातानंतर शेकडोंच्या संख्येतील संतप्त जमाव घटनास्थळी पोहचले. मात्र पोलिसांच्या समसूचकतेमुळे पुढील अनर्थ टाळला. ही घटना रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली.
एमएच ३६ ए.ए. ३३८१ क्रमांकाचा टिप्पर गिट्टी घेऊन तुमसरकडे जात होता. राजीव गांधी चौकातून एम.एच. ३६ टी. ९८०१ क्रमांकाच्या दुचाकीवरून अफसाना आणि कलीम हे दोन्ही बहिण भाऊ रुग्णालयातून घरी जात असताना दरम्यान या चौकातील वळणावर टिप्परने दुचाकीला उडविले. या दोघांनाही दुचाकीसह सुमारे २० फूट घासत नेले. यात अफसाना शेख या महिलेचा मृत्यू झाला. तर कलीम शेख याच्या पायाचा अक्षरशः चुरा-चूरा झाला.
अपघात घडला तेव्हा चौकात बरीच गर्दी आणि वर्दळही होती. योगायोगाने समोरून येणाऱ्या एका पोलिसांच्या वाहनाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने आपल्या वाहनातून या दोघांनाही एका खाजगी रुग्णालयात पोहोविचले. तिथे डॉक्टरांनी अफसाना यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टिप्पर चालकाला जमावाने मारहाण केली. त्याने जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. चालकाचे नाव कळू शकले नाही.
*अपघातानंतर जमावांचा घेराबंदी तणाव*
या अपघाताची माहिती पसरतात शेकडोंच्या संख्येने जमाव चौकात पोहोचला. टिप्परवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेऊन गर्दी पांगविली. जादा पोलीस कुमक मागवून टिप्पर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या बंदोबस्त चौकात तैनात होता. काही वेळातच पोलीसांच्या पथकाने जमावांची गर्दी कमी करून राजीव गांधी चौक सुरू करण्यात आला.