रस्ता सुरक्षा अभियान”; नेरळ पोलीसान मार्फत जन जागृती

64
रस्ता सुरक्षा अभियान”; नेरळ पोलीसान मार्फत जन जागृती

रस्ता सुरक्षा अभियान”; नेरळ पोलीसान मार्फत जन जागृती

रस्ता सुरक्षा अभियान”; नेरळ पोलीसान मार्फत जन जागृती
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

नेरळ :- दि.२० जानेवारी रस्ता सुरक्षा अभियान २०२४ या वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये राबवण्यात येत आहे. नागरिकांमध्ये व वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची चिन्हांची जनजागृती केली जात आहे. सर्व वाहन चालक वैद्यकीय तपासणी तसेच नेत्र तपासणी केली जात आहे. पटनात्यमार्फत नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची जनजागृती केली जात आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह मध्ये वर्षभरात अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान अंतर्गत बहनांवर रिफ्लेक्टर लावण्यात येतात. लायसन्स नसताना वाहन चालवायला देणे यास वाहन मालकाला प्रथम दंड ५००० रुपये दुसरा ५००० रुपये भरावा लागतो. विना लायसन्स वाहन चालवणे प्रथम दंड ५००० रुपये दुसरा ५००० रुपये भरावा लागतो. अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे अठरा वर्षाखालील प्रथम दंड ५००० रुपये दुसरा ५००० रुपये भरावा लागतो. लायसन्स जवळ न बाळगणे पहिला दंड ५०० रुपये दुसरा दंड १५०० रुपये . ट्रिपल सीट मोटरसायकल चालविणे पहिला दंड १००० रुपये दुसरा दंड १००० रुपये तिसऱ्यांदा पकडल्यास लायसन्सचे निलंबन केले जाते. विना हेल्मेट दुचाकी चालवणे पहिला दंड ५०० रुपये दुसरा दंड १५०० रुपये व जर तिसऱ्यांदा पकडल्यास लायसन्सचे निलंबन केले जाते. स्वीट बेल्ट न लावता गाडी चालवणे पहिला दंड २०० रुपये दुसऱ्यांदा दंड २०० रुपये लागते. वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे पहिला दंड ५०० रुपये दुसरा दंड १५०० रुपये व जर तिसऱ्यांदा पकडल्यास लायसन्सचे निलंबन केले जाते. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे यास कोर्टाद्वारे शिक्षा, दुसऱ्यांदा पकडल्यास शिक्षा केली जाते व तिसऱ्यांदा पकडल्यास लायसन्सचे निलंबन केले जाते. मद्यपान करून वाहन चालविणे कोर्टाद्वारे शिक्षा, दुसऱ्यांदा पकडल्यास शिक्षा केली जाते व जर तिसऱ्यांदा पकडल्यास लायसन्सचे निलंबन केले जाते. भरधाव वेगाने किंवा धोकादायक रित्या वाहन चालवणे कोर्टाद्वारे शिक्षा, दुसऱ्यांदा पकडल्यास शिक्षा व तिसऱ्यांदा पकडल्यास लायसन्स निलंबन केले जाते. चार चाकी वाहनांना काळा काचा लावणे प्रथम दंड ५०० रुपये द्वितीय पंधराशे रुपये दंड. पोलिसांच्या आदेशाचे पालन करणे प्रथम दंड ५०० रुपये द्वितीय दंड १५०० रुपये. सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करणे प्रथम दंड ५०० रुपये द्वितीय दंड १५०० रुपये, विना इन्शुरन्स वाहन चालवणे प्रथम दंड रुपये २०००, द्वितीय दंड रुपये ४०००, बिना इन्शुरन्स वाहन चालवायला देणे मालकाला प्रथम दंड रुपये २००० द्वितीय दंड रुपये ४०००, अवैध प्रवासी वाहतूक प्रथम दंड १०,००० रुपये द्वितीय दंड १०,००० रुपये तिसऱ्यांदा पकडल्यावर लायसन्सचे निलंबन केले जाते. म्हणून वाहतुकीचे “दहा सोनेरी नियम” दिले आहेत ते पालन केल्यास दंड किव्हा शिक्षा होणार नाहीत व अपघात होणार नाहीत १)दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा २)चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करावा ३) वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात वाहन चालवू नये ४) मध्य प्राशन करून वाहन चालवू नये ५)वाहन चालवताना लेन कटिंग करू नये ६)पादचाऱ्यांनी नेहमी फूट पाचचा वापर करावा ७) वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये ८)रस्त्यावर धोकादायक रित्या वाहन चालवू नये ९) पादचाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंग च्या ठिकाणीच रस्ता ओलांडावा १०)वाहन चालविताना पादचाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. वाहतूक सप्ताह निमित्त नेरळ साई मंदिर नाका येथे काळी-पिवळी इको कार तसेच ऑटो रिक्षा यांचे संयुक्तरीत्या वाहतूक नियमांचे बाबत मीटिंग घेण्यात आली. सदर मीटिंग करीता वीस ते पंचवीस चालक-मालक हजर असून त्यांना वाहतुकीच्या नियमाबाबत तसेच नवीन नियमाचे दंड आकारणीबाबत माहिती देण्यात आली. तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. लाड व नेरळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ वाहतूक शाखेकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री नांदगावकर पोलीस हवालदार (२०५८) अहिरे उपस्थित होते. तसेच रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीचे नियम सांगून वाहतुकीच्या नियमांचे पत्रक वाटप करण्यात आले.