शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी घुग्घुस येथे पोलिसांचा रूट मार्च
🖋️ साहिल सैय्यद
93079 48197
घुग्गुस : घुग्घुस येथील पोलिस ठाण्यातर्फे रविवार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रूट मार्च काढण्यात आला.
श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सवानिमित्तच्या पृष्ठभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी घुग्घुस पोलिस ठाण्यातून रूट मार्च काढण्यात आला जुना बसस्थानक, गांधी चौक मार्गे मार्गक्रमण करीत घुग्घुस पोलिस ठाण्यात रूट मार्चचे समापन करण्यात आले.
यावेळी ठाणेदार आसिफराजा शेख, सहा. पो. नि. प्रशांत साखरे, पोलिस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, अशोक बोढे, पोलिस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.