ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या महिलांना माधवी ताई जोशी युवा प्रतिष्ठान तर्फे बॅग वाटप

61

✒️ संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

कर्जत;गेली ४५ वर्षे चालत आलेली अखंड हरिनाम गजरात श्री ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळ्याची परंपरा आजतागायत नीत्यनियम सुरूच आहे. या सप्ताहमध्ये काकड आरती, श्री गीतापाठ, श्री ज्ञानेश्वरी पारायण,भजन, प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तन या सर्व कार्यक्रमांना कर्जतमधील भाविक आपले घरचे काम समजून आनंदाने सहभागी होतात. त्यामुळे सद्‌भावना, सत्प्रवृत्ती, स्वधर्म याची वाढ होउन भक्तिभाव व परस्परातील प्रेमभावना यांची वृद्धी होते. या सर्व कार्यक्रमांत सर्व थरातील अबाल, स्त्री पुरुषांना सहभागी होता येते ज्ञानेश्वरी पारायणास बसू इच्छिणाऱ्या वाचकांना पोषाख, माळ, वर्गणी अशी कोणतीही अट नाही. तसेच जय जय राम कृष्ण हरी हा नामजप १ कोटी करणेचा मानस आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांचा या ज्ञानेश्वरी पारायणात व नामजपात सहभागी सहभाग दिसत आहे.

दि.21 जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य श्री नरेश जोशी यांनी या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शवून ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या महिलांना बॅगचे वाटप केले.