वेध सह्याद्री तर्फे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी.

65

वेध सह्याद्री तर्फे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी.

खोपोली:- वेध सह्याद्री खोपोली तर्फे १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वेध सह्याद्री तर्फे मागील सात वर्षांपासून सातत्याने जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
यावेळी दि ११ जानेवारी २०२१ रोजी साकुपाडा येथील आदिवासी पाड्यात कपडे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.


१२ जनेवारी रोजी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोर रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारून किल्ल्याचा इतिहास खोपोली करांपर्यंत मांडण्याचा प्रयन्त संस्थेच्या सदस्यांमार्फत करण्यात आला.तसेच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद पहायला मिळाला.


या सर्व कार्यक्रमासाठी खोपोली नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सुमन औसारमल तसेच उपनगराध्यक्षा विनिता कांबळे औटी यांच्यासह खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक तसेच विविध पक्षांचे व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्तीत होते. या सर्व कार्यक्रमासाठी वेध सह्याद्रीच्या सर्व शिलेदाराणी मेहनत घेतली.