मौजा रामपूर येथे मारोती चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा तीन दिवसिय श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटामाटात संपन्न

88
मौजा रामपूर येथे मारोती चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा तीन दिवसिय श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटामाटात संपन्न

मौजा रामपूर येथे मारोती चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा तीन दिवसिय श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटामाटात संपन्न

मौजा रामपूर येथे मारोती चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा तीन दिवसिय श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटामाटात संपन्न

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : ( मांडेसर ) दिनांक २०, २१, २२ जानेवारी २०२४ रोजी भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा रामपूर / मांडेसर येथे अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून ” तीन दिवशीय श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मारोती चॅरिटेबल ट्रस्ट ” रामपूर ( मांडेसर ) येथील अध्यक्ष मा. धर्मराज तिवडे यांच्या पुढाकाराने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. गावातील हनुमान मंदीर , राम मंदीर, शक्ती माता माई मंदीर चौक ते हनुमान मंदीर चौक, व गावातील प्रत्येक गल्लो गल्लीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत वाजंत्रीच्या गजरात आणि जोरदार जयघोषाने परिसर अक्षरशः दणाणून निघाला.
यातच राम भक्तांनी वाजंत्रीच्या तालावर ठेका धरल्याने उपस्थितांच्या आनंदाला उठाण आले. ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेचे स्वागत केले. या शोभायात्रेमुळे मार्गावरील वातावरण भगवामय आणि राममय झाल्याचे दिसून आले. या शोभा यात्रेमध्ये जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे अध्यक्ष , सदस्य, महिला भगिनी मंडळ शेकडोच्या संख्येने श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेवर आस्था राखणारे समस्त गावकरी भक्त सहभागी झाले.

*मा. भवन लिल्हारे यांच्या अध्यक्षते खाली गावात काढली भजन दिंडी रॅली*
आज सर्वत्र अयोध्या येथील श्रीराममल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चैतन्यदायी वातावरण असतांना रामदिंडी मा. भवन लिल्हारे यांच्या अध्यक्षते खाली पार पाडण्यात आली. हे खास ” ह्यावेळी प्रमुख अतिथी गावातील पोलीस पाटील मा. महेश सव्वालाखे ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष मा. दुर्योधन अटराहे, मा. सुधाकरजी मलाधारी ग्रा.पं. सदस्य, सौ.कुकवावंती सव्वालाखे , सौ.शुभांगी अटराहे , मा. रमेश कातोरे, मा. देवचंदजी ठकरेले, मा. रामप्रसाद सव्वालाखे, ज्येष्ठ नागरिक मा . रामचंद्रजी बनकर, मा. इस्तारूजी सव्वालाखे, मा. जिवनजी सव्वालाखे, मा. गोपीचंद बनकर ‘ प्रामुख्याने उपस्थित होते.

*रॅलीत महिलांनी दिवे जाळून गाव प्रकाशमय केले*
मारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा रॅलीत महिलांनी दिवे लाऊन राम दिवाळी साजरी केली. या दिव्याच्या प्रकाशाने परिसर लखलखून गेल्याचे दिसून आले. ह्यावेळी मारुती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. धर्मराज तिवडे, उपाध्यक्ष मा.संतोष सव्वालाखे, सचिव मा.विजय बनकर, कोषाध्यक्ष मा.सुभाष सव्वालाखे, सहसचिव मा. सुरेश सव्वालाखे, सदस्य मा. रामु सव्वालाखे, मा. सुभाष इ. सव्वालाखे, मा. ढेकल कातोरे, मा. नारायणप्रसाद सव्वालाखे, मा.दुर्योधन अटराहे, मा. मुनिश्वर बावणे, मा. शालिकराव हमाहे, मा. भाऊलाल बनकर, मा. शत्रुघन गाढवे, मा. सेवक लांजेवार यांचे सहकार्य लाभले.

*श्री. जय बजरंग भजन मंडळाने काढली श्रीराम भजन दिंडी*
सुर नदीच्या काठावर वसलेले रामपूर / मांडेसर येथील ” श्री जय बजरंग भजन मंडळ ” यांच्या वतीने गावात भजन दिंडी काढण्यात आली. ह्यावेळी मा. शिवरामजी मालाधारी, सौ. पोर्णिमा सव्वालाखे, सौ. रत्नमाला बावणे, सौ. वर्षाताई धांडे, सौ. कामिनीताई सव्वालाखे, सौ. सरस्वती सव्वालाखे , सौ. दमयंती सव्वालाखे , सौ.पुष्पा सव्वालाखे, सौ.सत्यवती मालाधारी, सौ.उमाताई सव्वालाखे, सौ.उषाताई लुटे, श्री. मा.भालचंदजी मलाधारी, मा. जयचंदजी मालाधारी , मा. राजेपालजी मालाधारी, मा. लक्ष्मणजी गाढवे, मा. श्यामजी सव्वालाखे यांनी उपस्थित राहुन हनुमान चौक ते शक्ती माता मंदीर , येथे जनजागृती करून प्रभू श्रीराम भजन दिंडी मोठया थाटामाटात काढून संपूर्ण गाव रामभक्तीमय केले.

*गोपाल हरिभक्त समिती कडून महाप्रसाद*
गोपाल हरीभक्त यांच्या पुढाकाराने गावात भव्य रामरथ शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले. आज संपूर्ण देश राममय झालेला आहे. प्रत्येक व्यक्ती मोठ्या आनंदाने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा साक्षीदार बनला आहे. याच पावन पर्वाचे औचित्य साधून चि.रक्षपाल सव्वालाखे, रितिक सव्वालाखे ,जोगेश्वर सव्वालाखे,अविनाश सव्वालाखे, रोहित सव्वालाखे, मोहित सव्वालाखे, गोविंद बावणे ,पंकज निंबार्ते, चंद्रशेखर सव्वालाखे , आस्तिक सव्वालाखे, करण सव्वालाखे, भविष्य बनकर, अभिषेक सव्वालाखे , राकेश सव्वालाखे, अक्षय सव्वालाखे, कुणाल सव्वालाखे , रोहीत गी. सव्वालाखे, सौरभ सव्वालाखे , गणेश सव्वालाखे , रमण बावणे , अंकित गाढवे, प्रशांत सव्वालाखे, लोकेश लुटे , बादल पिंगळे , किशोर मालाधारी, आशिष ठकरेले, महेंक तिवडे, अमित बंधाटे, निशांत मालाधारी, आदित्य सव्वालाखे या श्रीराम भक्तांनी महाप्रसादाचे स्टॉल लावून संपूर्ण रामपूर / मांडेसर वासियांना महाप्रसाद वितरण केले.
आभार मारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष मा. धर्मराज तिवडे व सचिव मा. विजय बनकर यांनी मानले