घुग्घूस नगरपरिषदेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समाविष्ट प्रकरणात प्रचंड गैरव्यवहार ? • मी दलित म्हणूनच मला अपात्र केले – सचिन मुरार (न.प. कर्मचारी )

56
घुग्घूस नगरपरिषदेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समाविष्ट प्रकरणात प्रचंड गैरव्यवहार ? • मी दलित म्हणूनच मला अपात्र केले - सचिन मुरार (न.प. कर्मचारी )

घुग्घूस नगरपरिषदेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समाविष्ट प्रकरणात प्रचंड गैरव्यवहार ?

• मी दलित म्हणूनच मला अपात्र केले – सतीश मुरार
(न.प. कर्मचारी )

घुग्घूस नगरपरिषदेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समाविष्ट प्रकरणात प्रचंड गैरव्यवहार ? • मी दलित म्हणूनच मला अपात्र केले - सचिन मुरार (न.प. कर्मचारी )

🖋️ साहिल सैय्यद
📱93079 48197

घुग्घुस : 24 जानेवारी
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्या नंतर ग्रामपंचायत मधील जुन्या कर्मचाऱ्यांना नगर परिषदेत समाविष्ट करतांना प्रचंड आर्थिक गैरव्यवहार, व पक्षपातीपणा झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलेआहे.
नगरपरिषदेत पाणी पुरवठा कर्मचारी व रेकॉर्ड वरील नाली सफाई कर्मचारी सचिन मुरार यांना नगरपरिषदेच्या समावेशनात अपात्र घोषित करण्यात आले आहे.
ही अपात्रतेची कारवाई नगरपरिषदेच्या पहिल्या घोषणेच्या नंतर 31 ऑगस्ट 2020 रोजी व अंतिम घोषणेपूर्वी 31 डिसेंबर 2020 ला झाल्याने करण्यात आली आहे.

सतीश मुरार यांचा नमुना 24 वरील ठराव हा 28 मे 2020 चा आहे त्या अनुषंगाने त्यांना जून जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंत नियुक्ती मिळायला हवी होती
मात्र त्यांना ताटकळत ठेवून बाहेरून आलेल्या दिनेश बावणे याला पात्र करण्यात आले.
दिनेश बावणे याचा नमुना 24 वरील ठराव 29 जून 2020 चा असतांना त्याला मुरार याच्या आधी म्हणजेच 01 ऑगस्ट 2020 ला नियुक्त करण्यात आलेले आहे.
व मुरार यांचा आधी ठराव असतांना देखील त्यांना 01 सप्टेंबर 2020 रोजी नियुक्त करण्यात आले आहे.
याठिकाणी स्पष्ट असा गैरव्यवहार प्रथमदर्शनीच निदर्शनास येत आहे. या भोंगळ कारभाराची तक्रार मुरार यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासनाला दिलेली आहे.
तसेच आपण दलित समाजाचे व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यानेच आपल्यावर हा अन्याय झाल्याचा सणसणीत आरोप मुरार यांनी केला आहे.