श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळाच्या निमित्ताने खरसई गाव झाले राममय

59
श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळाच्या निमित्ताने खरसई गाव झाले राममय

श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळाच्या निमित्ताने खरसई गाव झाले राममय

श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळाच्या निमित्ताने खरसई गाव झाले राममय

✍️ संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा शहर प्रतिनिधी
📞 78758 71771📞

म्हसळा :-२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभु श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळाच्या निमित्ताने म्हसळा तालुक्यातील खरसई गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला, या निमित्ताने संपूर्ण गाव हे राम मय होऊन गावात ठिकठिकाणी भगव्या पताका लावण्यात आल्या, रांगोळी काढून सगळीकडे श्री राम यांचे फलक लावण्यात आले होते, काकडआरती, भजन, रामनामाचा जप, महाप्रसाद,मिरवणूक,वेषभूषा, दीपोत्सव, असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, याच कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रसिद्ध शिवव्याख्याते सचिन करडे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान ठेवण्यात आले होते व निरंकार मिशनचे प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी श्री राम चरित्र वाचून समस्त खरसई मंत्रमुग्ध झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखंड आगरी समाज, कोळी समाज, बौध्द समाज, श्री राम मंदीर डुंगी विभाग व संपूर्ण महिला मंडळ यांनी विषेश मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.