भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका : फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्ताने फातिमा शेख “महिला सक्षमीकरण आणि मार्गदर्शन केंद्राचे” अनावरण.

गुणवंत कांबळे प्रतिनिधी

मुंबई:- सावित्रीमाई फुले यांच्या सहयोगी फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त भारतीय लोकसत्ताक संघटना , लोक हितकारिणी संस्था (रजि) व आदर्श सामाजिक प्रतिष्ठान (रजि) यांचा संयुक्त विद्यमाने “फातिमा शेख” जयंती साजरी करण्यात आली. फातिमा शेख यांच्या प्रतिमेला प्रथम पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करण्यात आले.

तसेच लोकसत्ताक स्टडी सेंटर सायन येथे फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त्ताने “महिला सक्षमीकरण आणि मार्गदर्शन केंद्र”यांचे अनावरण सोहळा दीपिका संदीप खळे -आंग्रे मॅडम आणि स्थानिक रहिवासी दिलशान शेख यांच्या हस्ते करण्यात आला.उपस्थित झालेल्या प्रमुख पाहुणे आणि कार्यकर्त्याचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

फातिमा शेख जयंतीनिमित्त त्यांच्या जिवनातील प्रसंग व सावित्रीमाई फुले सहयोगी फातिमा शेख यांने शिक्षणासाठी दिलेले योगदान खुप मौल्यवान आहे हे प्रत्येकाने आपआपल्या भाषणात अनेकांनी व्यक्त केले. सई कांबळे या लहान मुलीने इंग्लिश मध्ये भाषण केले.तसेच मा.वत्सलाताई हिरे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती,सायन, मा.नंदिनी कांबळे युनिट अध्यक्ष भा.लो.वि.सं. गुरुनानक महाविद्यालय ,प्रेमसगर बागडे उपाध्यक्ष (भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ), मा.मंदा मोरे (सामाजिक कार्यकर्त्या) या सर्व मान्यवरांनी फातिमा शेख जयंती च्या शुभेच्छा दिल्या व आमच्या आयुष्यातील पहिल्यांदाच जयंती साजरी करत आहोत ,आम्हाला माहिती नव्हतं की फातिमा शेख यांचे शिक्षणा बदल योगदान …जयंती साजरी करण्यासाठी आम्हाला सहभागी केलात, “त्याबद्दल भारतीय लोकसत्ताक संघटना” आणि मा.अमोलकुमार बोधिराज सर यांचे सर्वांनी भाषणांत आभार व्यक्त केले.

सम्राट अशोक व्याख्यानमाला पुष्प तिसरे आयोजन फातिमा शेख जयंतीच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी प्रमुख अतिथी मार्गदर्शक मा.दीपिका संदीप खळे -आंग्रे (शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या) यांनी सावित्रीमाई फुले, फातिमा शेख आणि महिला चळवळ या विषयावर माहिती दिली.स्त्रीयांनी टिव्हीवरचे कार्यक्रम न बघितल्यास बरं असा टोला दिला. सावित्रीमाई फुले ,महात्मा फुले व फातिमा शेख यांच्या टीव्हीवरील सिरीयल चे एपिसोड दाखवून जीवनपट विषयी केलेल्या कार्याची महती दिली .जयंतीनिमित्त मला बोलावलात व पहिलांदाच फातिमा शेख जयंतीमध्ये सहभागी होण्याची आणि भाषण करण्यासाठी संधी मिळाली त्यामुळे संघटनेचे आभार मानले.

अमोलकुमार बोधिराज सर यांनी फातिमा शेख यांनी जयंतीनिमित्त स्टडी सेंटर येथे “फातिमा शेख”नावाने महिला -”शिक्षण” -“आरोग्य” -“रोजगार” -“कायदा” सक्षमीकरण आणि मार्गदर्शन केंद्र अनावरण केल्याबद्दल मत व्यक्त केले.सावित्रीच्या सोबतीनी खास नाव यासाठी कारण जरुर सावित्रीमाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची दार उघडी करून दिली.तसंच या सगळ्या स्त्रीयांनी भारतातल्या महिलांच्या हक्कासाठी प्रयत्न केले लढा दिला.म्हणून या क्रांतिकारी महिला काही सावित्रीमाईच्या समकालीन तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने सावित्रीच्या सोबतीनी सावित्रीमाई फुलेच्या सहयोगी सहशिक्षिका फातिमा शेख यांची काही प्रसंग सांगितले महात्मा ज्योतिब फुले यांना जेव्हा कुटुंबीयांनी घरा बाहेर काढले तेव्हा फातिमा शेख व त्यांचे भाऊ उस्मान शेख यांनी फुलेंना गंज पेठ ,पुणे येथिल त्यांच्या घरात शरण दिली.ज्योतिबांनी मुलीसाठी सुरु केलेल्या पहिल्या शाळेत फातिमा शेख यांनी शिक्षिका म्हणून काम केले.त्या भारतातील मुस्लिम समाजातील पहिल्या शिक्षिका आहेत. शिक्षणाविषयी त्यांनी दिलेले योगदान जनमानसात पोचवण्यासाठी प्रयत्न सर्वानी करूया असे म्हणाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.सुप्रिया मोहिते मॅडम यांनी भाषणात असे सांगितले आज जर मुली महिला शिक्षण घेत आहेत. तर त्या शिक्षणाचा उपयोग कुटुंब आणि समाजासाठी आला पाहिजे.समाज परिवर्तनाचे काम हे पुरुषापेक्षा जास्त स्रियांच करू शकतात. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या मान्यवरांचे आभार प्रदर्शन म्हणून मा.मनिष जाधव सर यांनी केले. फातिमा शेख जयंतीच्या कार्यक्रमांचे संपूर्ण सूत्रसंचालन मा.जान्हवी सावर्डेकर मॅडम यांनी केले. अपूर्वा गुप्ते, अश्विनी गायकवाड, सुनंदा कांबळे, अश्विनी पवडमन , लता चांनमारे (सामाजिक कार्यकर्त्या) स्मूती कांबळे, स्वरांगी मर्चंडे, कमलेश मोहिते, मंगेश खरात, सनी कांबळे, किशोर येडे, श्रयेश जाधव, पिलाजी कांबळे, दिनेश मोरे, भाऊसाहेब सावंत, राहुल बोबडे, संदिप आंग्रे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here