ताडोबा बफर क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात स्वच्छता कर्मचार्‍याचा मृत्यू

61

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 25 जानेवारी
वाघाच्या हल्ल्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात अस्थायी स्वच्छता कर्मचार्‍यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरूवार, 25 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. राम रामचंद्र हनवते(वय -54) असे मृतकाचे नाव असून, तो निमढेला येथील रहिवासी आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन गेल्या कित्येक वर्षापासून मृतक अस्थायी स्वच्छता कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावत होता. तर, त्याचा मुलगा रंजीत हनवते हा गाईड्स म्हणून कर्तव्य बजावतो. नित्यनियमाने आपले काम आटोपून बसून असताना कक्ष क्रमांक 58 मध्ये अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला. घटनास्थळ परिसरात उपस्थित पर्यटकांसमोरच त्याला वाघाने फरफटत जंगलात नेले. त्यामुळे पर्यटकांमध्येही भितीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी चमुसह घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा केलाा असून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी वृत्तलिहिस्तोवर घटनास्थळी भेट द्यायचे होते. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होताच मृतकाच्या कुटुंबियास आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती धानकुटे यांनी दिली.