रायगड विभागीय सुतार समाज संघ(रजि.) मुंबई- ठाणे.यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात संपन्न…
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-दि.२२/०१/२०२४, रोजी खरुडे सभागृह, वरळी-मुंबई, येथे सदरील समारंभ उत्साहात पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून के.ई.एम. हॉस्पिटलचे असिस्टंट डिन.डॉ.मनोज तेलकटवार साहेब, वैद्यकीय मदत कक्ष अधिकारी माननीय श्री, कृष्णा कदम साहेब, तसेच सामाजिक तळमळीने वैद्यकीय मदतीसाठी तत्पर असणारे श्री,नरेश मोरे साहेब, श्री शरद दादा मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष(पंतप्रधान विश्वकर्मा योजना सन्मानित)यांनी महत्वपूर्ण उपस्थिती दर्शविली आणि समाजोपयोगी उत्तम मार्गदर्शन केले.दर वर्षी प्रमाणे स्नेह संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थी गुणगौरव सोहळा, महिलांसाठी, पैठणी साडी व सोन्याची नथ लकी ड्रॉ म्हणून ठेवण्यात आले होते, हळदीकुंकू तसेच करोके ऑर्केस्ट्रा आणि नृत्य सादर केले गेले.*
सामाजिक योगदान म्हणून संघाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड आणि ई-श्रम नोंदणी अभियान मोफत राबविले गेले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय श्री तुलसीराम सुतार यांनी भुषविले होते.संघाचे विश्वस्त श्री मनोहर नांदगावकर, श्री बाळाराम सुतार, श्री श्रीराम सुतार,संघटक श्री धोंडू मेस्त्री, अध्यक्ष रामचंद्र सुतार, सचिव श्री संजय पांचाळ, सहसचिव श्री भावेश सुतार,यांनी सुत्रसंचलन केले.मान्यवर मंडळी, श्री नामदेव सुतार, रोहा तालुका अध्यक्ष, श्री पांडुरंग सुतार, पोलादपूर तालुका अध्यक्ष, श्री दिनेश सुतार,राजिवली(उपसरपंच), श्री विकास सुतार,तळोशी, श्री ज्ञानदेव दादा सुतार,नांगाव, महाड तालुका यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.युवक कार्यकारिणी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष श्री किरण शांताराम सुतार, श्री ज्ञानदीप सुतार, श्री निलेश सुतार, श्री विनोद सुतार, श्री प्रशांत मेस्त्री, श्री गणेश सुतार, श्री निधिर पांचाळ, श्री नंदकुमार पांचाळ, श्री संदेश महाडकर, यांच्या माध्यमातून सिनेकलावंत मी.हरिओम घाडगे सर यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला रंगमंचाचे स्वरूप दिले सर्व समाज बांधव यांच्या सहकार्याने आपले संमेलन रोमहर्षक वातावरणात संपन्न झाले.