७५ व्या प्रजासत्ताक दिन नेरळ पोलीस ठाणे साजरा
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ:-आज संपूर्ण भारत देशात ७५ प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहत साजर केला जातो. नेरळ पोलीस ठाणे येथे सकाळी ७.१५ वाजता प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आले. आपल्या महान राष्ट्राच्या सामर्थ्याचे, धैर्याचे आणि एकतेचे प्रतीक असलेला ध्वज नेहमी उंच फडकत राहू दे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविनाधाची अंमलबजावणी झाली होती. या दिवसाचे महत्त्व आणि प्रत्येक भारतीयाचा हा अभिमान आहे. प्रजासत्ताक दिनी आपल्या नशिबाला आकार देणाऱ्या आणि त्यांचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या भविष्यासाठी कार्य करणाऱ्यांचा हा खरा सन्मान. आपल्या मुलांचे भविष्य हे आपल्याच हातात आहे आणि आपणच त्यांना योग्य शिकवण देत प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अशा संदेशातून आणि कृतीतून जाणवून द्यायला हवी.