कळमेश्वरात बार्टी च्या वतिने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सप्ताहाचे आयोजन.

युवराज मेश्राम नागपुर प्रतीनिधी

कळमेश्वर:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या वतीने ३ जाने ते ८ जाने पर्यंत सावित्रीबाई फुले यांची जयंती “महिला शिक्षक दिन” सप्ताहाचे आयोजन बार्टी च्या समतादूत कुंदा ताई बोरकर यांनी केले कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन ज्योत्स्ना ताई मंडपे यांच्या हस्ते त्रिरत्न बुद्ध विहार येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व त्यांच्या संघर्षमयीन जीवनाबद्दल माहिती देऊन करण्यात आले त्यानंतर मानकर आदर्श विद्यालय, वरोडा ,श्री गजानन हायस्कूल ,आदासा स्मृती विद्यालय ब्राम्हणी कळमेश्वर यासारख्या विविध विद्यालय मध्ये व समाजभवनामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाची प्रेरणा आपण घ्यायला पाहिजे व सावित्रीबाई फुले ह्या एक विचारधारा आहे त्यांच्या विचारांचा पवाह हा नेहमीच आपणास समाजातील शोषणाविरुद्ध लढा देण्यास मार्गदर्शन करतो अशाप्रकारचे मौलिक मार्गदर्शन या सप्ताहाच्या निमित्ताने समतादूत यांनी केले.

या सप्ताहाच्या यशस्वी तेकरिता कळमेश्वर पालिकेच्या उपाध्यक्ष ज्योत्स्ना ताई मंडपे ,कळमेश्वर, प्रभुजी कराडे, जयाताई तभाने श्री संत सावता मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे शीतलकांडलकर आदर्श विद्यालय च्या प्राचार्या मानकर ,गजानन विद्यालय चे एस एस इखे सर,स्मृती विद्यालय च्या मुख्याध्यापक पी. के. पाल तागडे सर, तसेच वरील सर्व विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांचे तसेच गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले जिल्हा नागपूर यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here