नेरळ पोलीस ठाण्यात २९५ अन्वये दोन घुन्हे नोंद; सध्या वातावरण शांत

75
नेरळ पोलीस ठाण्यात २९५ अन्वये दोन घुन्हे नोंद; सध्या वातावरण शांत

नेरळ पोलीस ठाण्यात २९५ अन्वये दोन घुन्हे नोंद; सध्या वातावरण शांत

नेरळ पोलीस ठाण्यात २९५ अन्वये दोन घुन्हे नोंद; सध्या वातावरण शांत

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

नेरळ :-नेरळ पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. २९५ अन्वये र.जी. १६/१७ अशी दोन गुन्ह्याची नोंद झाली आहे. दि. २५ जानेवारी रोजी मौजे कळंब येथील फिर्यादी यांनी आरोपी यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील दिनांक २२.०१.२०२३ रोजी मीरा भाईदर येथे अयोध्या मध्ये श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेच्या वेळी हिंदू बांधवांनी काढलेल्या ऱ्याली वर काही मुस्लीम धर्माच्या लोकांनी दगडफेक केली व हिंदू लोक पळतानाचा व्हिडीओ व त्या व्हिडीओ “अलाच्या नावाने हम मोमिद मर्द मुजाहिद है,जिस राह परआयेंगे उस राह पर मारेंगे” वगैरे गाणे एडिट करून त्या व्हिडीओवर “mumbai mera road miya bhai power allah huabar” असा वादग्रस्त व्हिडीओ इंस्टाग्राम अकांउटवर प्रसारीत करून हिंदू समाजाच्या धार्मीकभावना दुखावल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आले. जातीय तणाव वाढू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले असून आत्ता दोन्ही समाजात शांततेचे वातावरण करण्यता उपविभागीय पो.अ. श्री.विजय लगारे यांच्या मार्ग दर्शनाखाली स.पो.नि. श्री शिवाजी ढवळे यश आले आहे.. तर दुसरा गुन्हा दिनांक २२/०१/२०२४ नेरळ येथे श्री रामाचे मिरवणुकीच्या वेळेस जामा मस्जिद समोरील रौफ खोत यांच्या दुकानाच्या छताच्या पाईपला झेंडा लावते वेळी आरोपी यांनी त्याची स्वतःची व्हिडीओ तयार करून त्या व्हिडीओ मध्ये ‘देव मस्तकी धरावा अवधी हलकल्लोळकरावा धर्मसंस्थापनेसाठी’ ‘तुमच्या तिकडे वळवळ करतात तर आम्हीच रक्तात छत्रपती शिवाजी महाराज घावतात’ असे वादग्रस्त शब्द टाकून इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ प्रसारीत करून मुस्लीम समाज्याच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ह्या वेळीस शांतता व मोहल्ला कमिटीच्या वतीने वातावरण शांत झाले. दोन्ही आरोपींना अटक करून मा.कोटार्त हजार करण्यात आले आहे. तर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी जनतेला अवाहन करण्यात आले आहे कि समाज माध्यमावरती काही आशेपार् पोस्ट टाकल्यामुळे किंवा आशेपर स्टेटस ठेवल्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये चार गुन्हे नोंद झालेले आहेत आणि आरोपींना अटक पण झालेली आहे. रायगड पोलीस दक्ष आहे आणि अशा प्रकारच्या काही हालचाली असतील किंवा धार्मिक तेठ निर्माण करणारे कुणी समाजकंटक असतील त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. नागरिकांना. आवाहन करतो की आपल्याला अशा प्रकारच्या काही गोष्टी निदर्शनास आल्यास आपण त्वरित नियंत्रण कक्षाला किंवा सायबर सेलला आपण माहिती द्यावी. (पोलीस नियंत्रण कक्ष ०२१४१२२८४७३,११२ मोबायील ७४४७७११११०)