मोहाडी पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना केली अटक , आरोपी कडून चार दुचाकी मोटरसायकल केली हस्तगत

73
मोहाडी पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना केली अटक , आरोपी कडून चार दुचाकी मोटरसायकल केली हस्तगत

मोहाडी पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना केली अटक ,

आरोपी कडून चार दुचाकी मोटरसायकल केली हस्तगत

मोहाडी पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना केली अटक , आरोपी कडून चार दुचाकी मोटरसायकल केली हस्तगत

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : ( मोहाडी )भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील परिसरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना मोहाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोन दुचाकी चोरणाऱ्या तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. विलास बिसन निमकर वय २२ वर्षे रा. धोप व नंदकिशोर घनश्याम कोहाड वय १९ वर्षे रा. मोहाडी अशी आरोपींची नावे आहेत.

मोहाडी व परिसरातील महालगाव, मांडळ , चिचखेडा आदी गावातून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. या प्रकारामुळे पोलीसही हैराण झाले होते. तपासात गुप्त सूचनेच्या आधारे एका तरुणाला ताब्यात घेतल्यावर दुचाकी चोरीचा भांडाफोड झाला. व आरोपी मात्र पोलिसांना गवसले. त्यांच्याकडून चोरी केलेले चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलिसांच्या तपासात अजून काही चोरी केलेला मुद्देमाल सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुचाकी चोरी करून स्वस्तात विकायचे व मिळालेल्या पैशातून तरुण हे मौजमस्ती करायचे,अशी माहिती आहे. तपास भंडारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक रोहित मतांनी , अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार , पोलीस हवालदार मुकेश भोंगाडे, त्रिमुर्ती लांडगे,दुर्योधन भुरे , विनोद लांडगे ,सुनील हुकरे, हे करीत आहेत.