येसंबा येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न.

55

येसंबा येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न.

वर्धा:- समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय या अभियानांतर्गत समता सैनिक दलाची शाखा स्थापन करण्यासंदर्भात सम्यक बुध्द विहार येसंबा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सभा संपन्न झाली.

यावेळी विचार मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समन्वयक मार्शल गौतम देशभ्रतार, जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख मार्शल प्रदीप कांबळे,तालुका सहसंघटक मार्शल मनोज थुल,तालुका प्रचारक मार्शल अविनाश गायकवाड,ज्येष्ठ मार्गदर्शक मार्शल पुंडलीकराव गाडगे, मार्शल दिगांबर लांबे, जिल्हा कोषप्रमुख मार्शल धर्मपाल ढोबळे,मार्शल हर्षल गजभिये, सामाजिक कार्यकर्ते मार्शल रवींद्र थुल उपस्थित होते.

सभेला मार्गदर्शन करतांना वर्धा जिल्हा  संघटक अभय कुंभारे म्हणाले की, समता सैनिक दल या मात्रु संघटनेला बळकटी प्रदान करण्यासाठी व आपण एका निश्चित आंबेडकर सुत्रामध्ये स्वतः ला बांधून घेण्यासाठी समता सैनिक दलात सामिल व्हावे.असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले.
सदर सभेला सरपंच सत्यवानजी भगत, मार्शल चिंदुजी भगत,मार्शल दिगांबर थुल, मार्शल सुमेध नाईक,मार्शल संजय थुल,मार्शल गोलू सावध,मार्शल जीवनराव नाईक,मार्शल स्वप्नील थुल, मार्शल सागर भगत, मार्शल सुरज थुल,मार्शल रामचंद्र ओंकार, मार्शल सौरभ थुल,मार्शल अशोकराव नाईक, मार्शल संदेश थुल,मार्शल अनिरुद्ध थुल,मार्शल आदित्य थुल,मार्शल धीरज थुल, सौ. सुवर्णाताई थुल, रंजना थुल, पुष्पाबाई थुल,उज्वला नाईक,पुष्पाबाई बावणे व समस्त गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होती.