म्हसळा पोलीस ठाणे वतीने अक्षता अढागळे हिचा सत्कार

62
म्हसळा पोलीस ठाणे वतीने अक्षता अढागळे हिचा सत्कार

म्हसळा पोलीस ठाणे वतीने अक्षता अढागळे हिचा सत्कार

म्हसळा पोलीस ठाणे वतीने अक्षता अढागळे हिचा सत्कार

✍️संतोष उध्दरकर✍️
म्हसळा शहर प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :- म्हसळा तालुक्यातील कन्या राज्यसेवा परिक्षा उत्तीर्ण केल्या बद्दल म्हसळा पोलीस ठाण्याच्या वतीने म्हसळा पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना संदिपान सोनावणे यांनी सांगितले की म्हसळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी व तालुक्यातील विद्यार्थी अधिकाधिक स्पर्धा परीक्षा कडे वळावी व एक उद्याचा अधिकारी बनावा हाच या मागील उद्देश आहे. अक्षता अढागळे ही म्हसळा तालुक्यातील कन्या आहे व राज्यसेवा परिक्षा उत्तीर्ण केली आहे याचे आम्हाला अभिमान आहे, म्हसळा पोलीस ठाण्याच्या वतीने व म्हसळा पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे यांनी माझा सत्कार केला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे व मला याबद्दल खूप आनंद वाटत आहे. माझे विद्यार्थ्यांना सांगणे आहे की स्पर्धा परीक्षा द्या, शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे, जिद्द व महत्वकांक्षा असेल तर ध्येय साध्य करता येते व तुम्ही नक्कीच यशस्वी होणार असे अक्षता अढागळे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित म्हसळा पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे, सौ. सोनावणे, पाटील मॅडम, समर्थ सांगळे, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.