कोरपणा येथे मिराई वृद्धाश्रमाचे लोकार्पण

50
कोरपणा येथे मिराई वृद्धाश्रमाचे लोकार्पण

कोरपणा येथे मिराई वृद्धाश्रमाचे लोकार्पण

कोरपणा येथे मिराई वृद्धाश्रमाचे लोकार्पण

✍️मनोज गोरे
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.९९२३३५८९७०

कोरपना :- कोरपणा तालुका आदिवासी दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात प्रथमच कोरफण्यासारख्या शहरांमध्ये स्वर्गीय मीराबाई चित्राजे टेकाम बुद्ध संस्था गडचंदुरद्वारा संचालित मिराई वृद्धाश्रमाचे उद्घाटन मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते पार पडलेत आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माधुरी टेकाम शेखर तावडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अलका कुबल यांनी यावेळी उपस्थित त्यांना संबोधित केले तसेच कोरपणा शहरातील महिलांचे हितगुज केला यावेळी मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होत्या.बालकलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली. इयत्ता १०वी मध्ये असताना त्यांनी चक्र या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. नटसम्राट, संध्याछाया, वेडा वृंदावन अशा काही नाटकांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. स्त्रीधन या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत अभिनेत्री म्हणून प्रवेश केला. माहेरची साडी ह्या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यासोबतच लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले. यांपैकी काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली. अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाशझेप, माझी आई काळुबाई अशा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. अशा या मराठी सिने अभिनेत्रीने कोरपणा तालुक्याच्या ठिकाणी येऊन ग्रामीण भागाच्या महिलांची संवाद साधले. अलका कुबल प्रतिनिधीशी बोलताना निर्भीडपणे त्यांनी आपल्या जीवनातील काय रे शैलीवर प्रकाश टाकला चित्रपट घराघरात पोहोचलां. अजूनही मराठी चित्रपट पाहण्यांकडे नागरिकांचा कल आहेत असे मत व्यक्त केले.