दहापैकी 9 गृहिणी म्हणतात, पुरुषांनीही घरकामात हातभार लावावा.

लॉकडाऊनच्या काळात अनेक पुरुष घरकामात मदत करताना दिसले. त्यामुळे गृहिणींच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत. पुरुषांनीही घरकामात हातभार लावावा, असे मत सर्वेक्षणातील 10 पैकी 9 गृहिणींनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वेक्षणातील तरुण गृहिणींमध्ये हा विचार सर्वाधिक दिसून आला.

गृहिणींच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. राज्यातील 10 पैकी 6 गृहिणींनी स्वयंपाकातील वेळ वाचवून स्वतःच्या आवडीनिवडी जपायला आवडेल असे सांगितले. घरकामातून किमान अर्धा तास मिळाला तरी आपण आवडीनिवडी जपू. त्यासाठी फक्त कुटुंबियांकडून अधिक पाठिंबा मिळायला हवा, अशी इच्छा 37 टक्के गृहिणींनी व्यक्त केली. 40 ते 45 या वयोगटातील 61 टक्के महिला त्यांचा बहुतांश वेळ घरातील कामे, विशेषतः स्वयंपाक आणि मुलांची काळजी घेण्यात घालवत असल्याचे आढळले. सर्वक्षणात सहभागी झालेल्या 60 टक्क्यांहून अधिक महिलांनी फक्त गृहिणी न राहता त्यापलीकडे काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here