गडचांदूर परिसरात अवैध कोळसा तस्करी जोमात
🖋️ *साहिल सैय्यद*
📲 *9307948197*
गडचांदुर : 30 जानेवारी
शहरालगत असलेल्या कोळसा खाणीतुन मोठ्या प्रमाणात रात्रदिवस कोळश्याची वाहतूक सुरू असते.
कोळश्याची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांशी परस्पर संगनमत करून कोल माफिया मोकळ्या जागेवर कोळसा पाडून घेतात व जवळच्या शेतात या कोळश्याचा साठा केला जातो यामध्ये कोळशावर पाणी मारून हा कोळसा नागाळा परिसरातील कोल डेपोवर विकल्या जातो.
गेल्या अनेक महिन्यापासून या कोळश्याची अवैधरित्या तस्करी जोमात सुरु आहे मात्र, पोलीस प्रशासनाचे याकडे नेहमीचे होत असलेले दुर्लक्ष संशयास्पद असून या अवैध कोळसा तस्करांना पोलिसांचा छुपा आशिर्वाद तर नाही ना ? अशी शंका परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.
या कोळसा तस्करीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
रस्त्यावर फेकण्यात येत असलेल्या कोळश्यापासून सामान्य नागरिक अपघाताला बळी पडण्याची शक्यता आहे.
तसेच या कोल माफियांकडून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांनाही त्रास होत असतो.
या बाबतीत वरिष्ठ पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन कोळसा तस्करीला लगाम घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.