रिपब्लिक रन वॉक चेलेंज 2024 मध्ये नेरळच्या 10वर्षीय हिरेन ची कमाल..
55 किमी अंतर चार तास 27 मिनिटात पार केले
✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333
नेरळ गावातील एका चहा विकणाऱ्या तरुणाच्या मुलाने सायकलप पट्टू म्हणून उत्तुंग कामगिरी केली आहे.10वर्षीय हिरेन राम हिसाळगे या मुलाने रिपब्लिक राईड रन वॉक चॅलेंज आणि राष्ट्रीय युवा दिवस राईड मध्ये 55 किलोमीटर अंतर अवघ्या 4 तास 27 मिनिटात पार करून यशस्वी राईड केली.
प्रजासत्तक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारी ते 3फेब्रुवारी या कालावधीत रिपब्लिक राईड रन वॉक चॅलेंज 2024 आणि राष्ट्रीय युवा दिवस राईड 2024 आयोजित केली होती. सायकलपटू यांच्यासाठी वेगवेगळ्या किलोमीटर सायकल चालविण्याची स्पर्धा जाहीर करण्यात आली होती.नेरळ गावातील हिरेन राम हिसालगे या 10 वर्षीय सायकलपटूने 15 ऑगस्ट रोजी शहिदांना अभिवादन करण्यासाठी नेरळ ते खालापूर 36 किलोमीटर तर 2 जानेवारी 2024 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी नेरळ ते सिद्धगड असा सायकल प्रवास केला होता.नेरळ पोलीस ठाण्याचे समोर रस्त्याच्या बाजूला चहा चे दुकान चालविणाऱ्या राम हिसालगे यांच्या नेरळ गावातील विद्या विकास मंदिर शाळेत शिकत असलेल्या मुलाने आज 28 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी नेरळ पोलीस ठाणे येथून सायकल प्रवास सुरू केला.नेरळ गावातून माथेरान नेरळ कळंब रस्त्याने कळंब असे जात पुढे शहापूर मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने वारे,कशेळे,कडाव,कर्जत असे प्रवास करीत कुठेही न थांबता कर्जत नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्त्याने सकाळी साडेदहा वाजता नेरळ येथील हुतात्मा चौक गाठले.तासाला साडे बारा किलोमीटर तर मिनिटाला 384मीटर अंतर हिरेन आपल्या सायकल वरून पार करीत होता.
हिरेन याने आपला सायकल प्रवास कुठेही न थांबता चार तास 27 मिनिटात तब्बल 55 किलोमीटर अंतर पार करीत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय राईड मध्ये सहभाग नोंदविला. नेरळ येथे पोहचल्यावर हुतात्मा स्मारक समितीच्या सदस्यांनी हिरेन चे कौतुक केले.त्याने इतक्या कमी वयात राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त दिलेले चॅलेंज यशस्वी केल्याबद्दल केले आहे.