उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची म्हसळा येथे जाहीर सभा.. कोणावर ठाकरी तोफ धडकणार सर्वांचे लक्ष.

66

✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा शहर प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :- उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा रायगड जिल्ह्यात १ व २ फेब्रुवारी रोजी जनसंवाद दौरा होणार आहे, १फेब्रुवारी रोजी पेण, अलिबाग, रोहा तर २ फेब्रुवारी रोजी पोलादपूर, म्हसळा, माणगाव येथे सभा होणार आहेत. उध्दव ठाकरे यांच्या २ तारखेच्या सभेमुळे उ.बा.ठा.शिवसैनिकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यासाठी म्हसळा तालुक्यात उध्दव ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे, आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांचा रायगड दौरा निश्चित झाल्याचे रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी म्हसळा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. म्हसळा तालुक्यात ठिकठिकाणी जावुन जेष्ठ श्रेष्ठ आजी माजी शिवसैनिक यांच्या भेटी घेण्यात येत आहेत ही सभा २ फेब्रुवारी रोजी म्हसळा शहरात दिघी रोड येथे दुपारी ३ वा. होणार आहे, सभेचे नियोजन योग्य पध्दतीने करण्यात येणार आहे व उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेचे नेते अनंत गीते, सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत असे देखील नवगणे यांनी सांगितले.
कुणाचा समाचार घेणार व कुणावर ठाकरी तोफ धडकणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंचवीस ते तिस वर्षापूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा याच ठिकाणी गाजली होती व आता उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची सभा देखील याच ठिकाणी होऊन गाजणार आहे असे आजी माजी शिवसैनिकाचे म्हणणे आहे.