चंद्रपूरातील एका पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकासह 10 जणांवर गुन्हा दाखल • चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय नागरी सहकारी पंतसंस्थेत गैरव्यवहार उघडकीस

54
चंद्रपूरातील एका पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकासह 10 जणांवर गुन्हा दाखल • चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय नागरी सहकारी पंतसंस्थेत गैरव्यवहार उघडकीस

चंद्रपूरातील एका पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकासह 10 जणांवर गुन्हा दाखल

• चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय नागरी सहकारी पंतसंस्थेत गैरव्यवहार उघडकीस

चंद्रपूरातील एका पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकासह 10 जणांवर गुन्हा दाखल • चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय नागरी सहकारी पंतसंस्थेत गैरव्यवहार उघडकीस

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 1 फेब्रुवारी
चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय नागरी सहकारी पंतपस्थेत 49 लाख 48 हजार 178 रूपयाचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष गौतम जीवने, उपाध्यक्ष अजित भडके, व्यवस्थापक राजाराम भडके यांच्यासह अन्य 10 जणांविरूद्ध भादंवी 406, 409, 420, 34 भादंवी, सहकलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा सनदी लेखापाल रमणकुमार निमकर यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या अन्य संचालकांमध्ये लोकचंद लिव्हारे, देवराव पिंपळकर, सुभद्रा निरापुरे, गीता दास, गिता पालनवार, रवींद्र बारेकर यांचा समावेश आहे. संस्थेच्या संचालक मंडळांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2021 या कालावधीत 49 लाख 48 हजार 178 रूपयाचा गैरव्यवहार केला असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी दैनंदिन ठेव, आवर्ती ठेव व मुदत ठेव अशा योजनेमध्ये रक्कमेची गुंतवणूक केली आहे. पण, पतसंस्थेकडून गुंतवणूकदारांना रक्कम परत केली नाही. अशा गुंतवणूकदारांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. गुंतवणूक करणार्‍यांनी समोर येऊन याबाबतची माहिती पोलिस विभागाला द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले आहे.