सर्व्हेक्षण प्रगणकाच्या निलंबनाने मनपा कर्मचार्‍यांत खळबळ • मुदतीत सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश

58
सर्व्हेक्षण प्रगणकाच्या निलंबनाने मनपा कर्मचार्‍यांत खळबळ • मुदतीत सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश

सर्व्हेक्षण प्रगणकाच्या निलंबनाने मनपा कर्मचार्‍यांत खळबळ

• मुदतीत सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश

सर्व्हेक्षण प्रगणकाच्या निलंबनाने मनपा कर्मचार्‍यांत खळबळ • मुदतीत सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 1 फेब्रुवारी
मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्व्हेक्षणाच्या कामात दुर्लक्ष केल्याने सर्वेक्षण प्रगणक सुनील माळवे यांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्तांच्या या कार्यवाहीने मनपातील अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. सर्व्हेक्षण हे महत्वाचे शासकीय कार्य असल्याने मुदतीत व काटेकोरपणे करण्याचे निर्देश मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी बुधवारी दिले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा व  खुल्या प्रवर्गातील समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी कुटुंबातील नागरिकांचे सर्व्हेक्षण 23 जानेवारीपासून केले जात आहे. या कामात महानगरपालिकेतर्फे 49 पर्यवेक्षक व 739 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या कर्मचार्‍यांना रितसर प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले. मात्र, प्रगणक म्हणून जबाबदारी देण्यात आलेले सुनील माळवे यांनी प्रशिक्षण पूर्ण करूनसुद्धा काम स्वीकारले नाही. अनेकवेळा सुचना देऊनदेखील काम सुरु न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची सक्त कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्व्हेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत 56 हजार 246 कुटुंबाचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सर्व्हेक्षण दरम्यान, मनपा हद्दीतील सर्व निवासी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत असून, भाडेकरू कुटुंबाचेसुद्धा सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना संबंधित प्रगणक यांना देण्यात आल्या आहे. ज्या कुटुंबांचे सर्व्हेक्षण 1 फेब्रुवारीपर्यंत होऊ शकले नाही. अशा कुटुंब प्रमुखांनी मनपा मुख्य झोन कार्यालय, क्षेत्रीय कर निरीक्षक अथवा मनपा मुख्य झोन कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.