उसगावच्या महिलांची पोलिस ठाण्यात धडक, एसीसी कंपनी विरोधात रोष
साहिल सैय्यद
9307948197
उसगाव येथील महिलांनी एसीसी कंपनीविरोधात गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी पोलिस स्टेशनला धडक दिली.उसगाव ते घुग्घुसकडे जाणारा जवळपास ५० वर्षांपासून सुरु असलेला रस्ता एसीसी सिमेंट कंपनीने बंद केला त्यामुळे उसगावच्या महिलांना ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात येऊन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली व हि समस्या सांगितली.हि समस्या लक्षात घेत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकाश अमरशेट्टीवार व नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांच्याशी संपर्क साधून उसगाव येथील समस्या सांगितली. तसेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली.उसगावच्या महिलांनी पोलिस स्टेशन गाठले व एसीसी कंपनीविरोधात रोष व्यक्त केला याबाबत कळताच उसगावच्या सरपंच निविता ठाकरे, काँग्रेसचे नेते रोशन पचारे, प्रेमानंद जोगी, उपसरपंच मंगेश आसुटकर सदस्य मंगल फुलझले, यमुना राजूरकर यांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकाश अमरशेट्टीवार, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांनी पोलिस स्टेशन येथे येऊन उसगावच्या महिलांशी चर्चा केली.एसीसी सिमेंट कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि उसगाव ते घुग्घुसकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन पोलिस स्टेशन येथे देण्यात आले.यावेळी सहा.पो. नि. प्रशांत साखरे, उसगावच्या सुनीता बावणे, जुली मुन, सुरेखा काळे, मंगला आवारी, वृंदा आवारी, इंदिरा बोबडे, लता बावणे, घुग्घुस भाजपाचे विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, वमशी महाकाली व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.