कोठारी इंटरनॅशनल स्कुलला शासनाची मान्यताच नाही
शासनाची फसवणूक व पालकांची लूट करणाऱ्या कोठारी शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा : पनवेल पत्रकार मित्र असोसिएशन
✍️विजय तळकर ✍️
पनवेल विभाग प्रतिनिधी
📞72080 66088📞
पनवेल :-पनवेल तालुक्यामध्ये शासनाची मान्यता न घेता काही संस्थांनी प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु केल्या आहेत. वास्तविक पाहता शाळा सुरु करण्यापूर्वी संस्थांनी शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायत हद्दीतील कोठारी पब्लिक स्कुल या शाळेने शासनाची मान्यता घेतलेली नाही त्यामुळे शिक्षण विभागाने या शाळा अनधिकृत शाळा म्हणून घोषित केल्या आहेत.
कोठारी इंटरनॅशनल स्कुल यांनी नुकतेच मोठे थाटामाटात उदघाटन केले व ऍडमिशन घेणाऱ्या नागरिकांची फि आणि डोनेशनच्या नावाने लूट करीत असल्याची माहिती नागरिकांनी कोकण संध्याशी बोलताना दिली. कोठारी स्कुलला मान्यता नसून शाळेत सिसिटीव्ही नाहीत, शाळेला ग्रील लावले नाही, तसेच पालकांचे उत्पन्न विचारण्याचा कोणताही शाळेला अधिकार नसताना कोठारी शाळा व्यवस्थापन मात्र पालकांचे उत्पन्न का विचारते असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला असून लवकरच या शाळेच्या मनमानी कारभारा विरोधात पालक आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत.
याबाबत गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती पनवेल एस. आर. मोहिते यांना विचारणा केली असता त्यांनी कोकण संध्याला पनवेल तालुक्यातील अनधिकृत शाळेची यादी दिली असून यामध्ये कोठारी इंटरनॅशनल पब्लिक स्कुलचे नाव समाविष्ट आहे तरी या शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व भविष्यात या शाळेला शासनाने मान्यता देऊ नये अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली असून पालकांनी देखील कोठारी शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी सावध व योग्य माहिती घेऊनच प्रवेश घ्यावा अशी सूचना शिक्षणविभागाकडून करण्यात आली आहे.