न्यू इंग्लिश स्कूल चांदोरे येथे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा संपन्न.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगांव :- माणगाव तालुक्यातील पन्हळघर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ लोणेरे या संस्थेचे हायस्कूल न्यू इंग्लिश स्कूल चांदोरे येथे विविध सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धा हे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करून विद्येची देवता सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प माळ अर्पण करण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत, इशस्तवण घेवून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे उदघाटन राजाराम इंदुलकर यांनी श्रीफळ वाढवून केले. अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कूल शाळा समितीचे अध्यक्ष दिनकरजी शिंदे साहेब यांची निवड करण्यात आली.
न्यू इंग्लिश स्कूल चांदोरेचे शिक्षक राजेंद्र जंगम सर
यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अगदी उत्तम रित्या केले तसेच आपल्या शाळे विषयी लेखाजोगा मांडला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, गुणवत्ता यादीत प्रथम आलेले तसेच क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देत त्यांचे गौरव करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे जे.बी.सावंत संस्थेचे संस्थापक म्हणून भाऊ सावंत सर,जे.बी.सावंत संस्थेचे लेखनिक टेंबे सर, घ.ल.घोसाळकर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आर.एच.कांबळे सर, येस. बी. इंगळे सर, माणगाव मुख्याध्यापक संघ अध्यक्ष कांबळे सर, ई.प्रमुख अतिथी व जे,बी.सावंत गांगवली हायस्कूलचे शिक्षक जाधव सर, व लेखनिक संदेश खामगावकर शाळा समिती अध्यक्ष दिनकरजी शिंदे साहेब, विष्णुजी सावंत पंचायत समिती माजी सभापती सुजितजी शिंदे सरपंच ग्रामपंचायत चांदोरे साक्षी शिंदे मॅडम ग्रामपंचायत सदस्य सुधा लोखंडे मॅडम, सुरेशजी इंदुलकर,राजाराम इंदुलकर, रामचंद्र लोखंडे , जयंतजी कापडी, माजी सरपंच कृष्णाजी गोरेगावकर, मानव अधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळाराम तांबे,माजी उपसरपंच मेघा सावंत मॅडम, आदी मान्यवर उपस्थित होते.न्यू इंग्लिश स्कूल चांदोरेचे सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची धुरा अगदी शेवट पर्यंत राजेंद्रजी जंगम सर यांनी उत्तम प्रकारे सांभाळली.तर मुख्याध्यापक संतोषजी कासारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी व पंच क्रोशितील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन राजेंद्रजी जंगम सर यांनी केले. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवित वाहवा मिळविली. देशभक्तीपर कार्यक्रमांना मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थित राहून या बालकांचे कौतुक केले.