कुंभेट बीबट्याने पाडला दोन जनावरांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट

64
कुंभेट बीबट्याने पाडला दोन जनावरांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट

कुंभेट बीबट्याने पाडला दोन जनावरांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट

कुंभेट बीबट्याने पाडला दोन जनावरांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट

✍🏻किशोर पितळे✍🏻
तळा तालुका प्रतिनिधी
मो. ९०२८५५८५२९

तळा :- कुंभेट परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे येथे बिबट्याने एका गायीचा आणि एका वासराचा फडशा फडशा पाडला आहे.या घटनेनंतर पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कुंभेटचे रहिवाशी बाळाराम पातेरे शेतात गेले असता त्यांना गाईचा पाया जवळचा भाग खाल्लेला दिसला. गायीच्या आजुबाजुला रक्ताचे थारोळे पडलेले होते.या घटनेच्या आठ दिवसांपुर्वी लक्ष्मी निकम या महिलेच्या वासराच फडशा बिबट्याने पाडला होता.घटनेची माहिती वनविभागाला दिली असता त्यांनी गावातील त्यांचे कर्मचारी यांना पहाणी करायला लावले, हा हल्ला बिबट्याने केला असल्याच्या माहितीला वनविभागाने दुजोरा दिला.
कुंभेट,पीटसई ता.तळा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बीबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. गावातील शेळ्या गाई वासरे हा बीबट्या फस्त करण्याच्या मार्गावर असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. मानवी वस्तीकडे लक्ष्य केंद्रीत केलेल्या या बीबट्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तळा-मांदाड या मुख्य मार्गावर केवळ चार किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत कुंभेट हे गाव वसले आहे. या गावाच्या बाजुलाच पीटसई गाव आहे. दोन्ही गावांमधील शेतकरी गुरे चारण्यासाठी डोंगरात जातात. येथील काही ग्रामस्थांच्या तसेच काही गुराख्यांच्या दृष्टीस हा बीबट्या पडला.बिबट्याच्या भीतीने ग्रामस्थांनी मध्यंतरी रानात गुरे सोडणेही बंद केले होते.दाट झाडी असणाऱ्या ठिकाणावर या वाघाचे वास्तव्य असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलेे. वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कुंभेट आणि मालुक गावातील विद्यार्थी चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणारया अशोक लोखंडे विद्यामंदिर पीटसई येथे शिकण्यासाठी रोज पाई चालत जातात त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवतानाही ते दहा वेळा विचार करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा बिबट्या रात्रीच्या वेळी शिकारीला बाहेर पडत असुन सध्या या परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. त्यामुळे चटावलेला हा बिबट्या अन्न न मिळाल्यास मनुष्यावरही हल्ला करू शकतो.वनविभागाने याची ताबडतोब दखल घेऊन ग्रामस्थांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.तळा वनमंडळ अधिकारी विलास तांबे यांनी आपल्या सहकारी यांच्या मदतीने कुंभेट परिसराची पहाणी केली आहे. याबाबत वनअधिकारी तांबे म्हणालेे, या परिसरात बिबट्याचा वावर आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांची नुकसान भरपाई मिळवून देण्यास सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे बीबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येणार आल्याचे त्यांनी सांगितले.

*विलास तांबे- वनमंडळ अधिकारी तळा*
या परिसरात बिबट्याचा वावर आहे, ग्रामस्थांनी भयभीत होऊ नये, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांची नुकसान भरपाई शासनाकडून मिळवून देण्यास सहकार्य करणार आहे त्याचप्रमाणे बीबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येणार आहे.

*संजू कजबले कुंभेट गाव शेतकरी*

कुंभेट परिसरात घनदाट जंगल असल्या करणारे येथे बिबट्याचा वावर आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांची भरपाई शासनाकडून मिळावी ही अपेक्षा असून
कुंभेट आणि मालुक गावातील विद्यार्थी हे अशोक लोखंडे विद्यामंदिर येथे शिक्षणासाठी चार ते पाच किलोमीटर रोज चालत येतात बिबट्याच्या दहशतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताच परिणाम होऊ नये यासाठी शासनाने याबाबतीत गांभीर्याने लक्ष द्यावे हीच अपेक्षा आहे.