भाजप विरोधात ई.पी.एस.पेन्शन धारकांनी उठवले रान.वाढीव पेन्शन साठी जेष्ठ पेंन्शनघारक आक्रमक

64
भाजप विरोधात ई.पी.एस.पेन्शन धारकांनी उठवले रान.वाढीव पेन्शन साठी जेष्ठ पेंन्शनघारक आक्रमक

भाजप विरोधात ई.पी.एस.पेन्शन धारकांनी उठवले रान.वाढीव पेन्शन साठी जेष्ठ पेंन्शनघारक आक्रमक

भाजप विरोधात ई.पी.एस.पेन्शन धारकांनी उठवले रान.वाढीव पेन्शन साठी जेष्ठ पेंन्शनघारक आक्रमक

✍🏻किशोर पितळे✍🏻
तळा तालुका प्रतिनिधी
9028558529

तळा :- घटने प्रमाणेचनाही तर कोर्टाने आदेश देऊनही देशातील ई.पी.एस.पेन्शन धारकांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या, तर अच्छे दिनचा फसवा जाहीरनामा घोषित करुन गेली१०वर्षे सत्ताभोगणाऱ्या भाजप विरोधात ईपीएस पेन्शनधारकांनी रान उठवले असून वाढीव पेन्शन नाही तर सत्ताधारी भाजपला मतदान नाही. पेन्शन आमच्याहक्काची,नाहिकोणाच्या बापाची,या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देऊन आंदोलनाद्वारेजिल्हाकार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
देशात शेकडो उद्योग व्यवसाय आणि सेवेच्या माध्यमातुन देश प्रगतीपथावर आणून महासत्तेकडे वाटचाल करू पाहणाऱ्यादेशातील लाखो कामगार वर्गाने आपले  तारुण्यातील आयुष्य वेचले, त्या कामगारांच्या बुध्दीच्या, कष्टाच्या आणि मेहनतीच्या जीवावर देशाची प्रगती झाली हे मान्य असताना त्याचाच ई.पी.एस. फंडातून जमा केलेल्या रकमेतून वाढीव पेन्शनची रास्त मागणी गेले अनेक वर्षे लावून धरलीअसून त्या मागणीलाकेंद्रातही शेकडोखासदारांनी उठाव केल्याची नोंद आहे. इतकेच नाही सरकारने नेमलेल्या विविध समितीसह भगतशिह कोशियारी समितीचा सूचिनेसह,कोर्टाने सुध्दा आदेश देऊनही दखल न घेणाऱ्या केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात देशातील ई.पी.एस ९५ पेन्शन धारकांनी लढा उभा केला या पुर्वी संघटनेच्या माध्यमातुन निवेदने दिल्ली, मुंबई कार्यालयात दिली, काही राज्यांत रास्ता रोको,रेल रोको,महामार्ग रोको करून सरकारचे लक्ष वेधूंनही “मुक बधीर” सरकारला हालवून जागे करण्यासाठी पेंन्शन संघटनेने प्रत्येक जिल्ह्यातजिल्हाधिकारीकार्यालयासमोर धरणे आंदोलन करून देशातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यां मार्फत देशाचेपंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, देशाच्या अर्थमंत्री माननीय, निर्मला सीतारामन, तसेच देशाचे कामगार मंत्री माननीय भूपेंदरजी यादव साहेब याना निवेदन देऊन आम्हा कामगार वर्गाच्याहक्काची वाढीव पेन्शनची मागणी केली आहे. यावेळी निवेदनात उल्लेखनीय बाब म्हणजे आमच्या ई पी एस ९५पेन्शन धारकांचा मागण्या मान्य केल्या नाहीत तरनाईलाजाने आम्हाला नाराजी व्यक्त करुन येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत आपल्या सरकार अर्थातच भाजप विरोधात मतदान करण्याशिवाय पर्याय रहाणार नाही असा इशारावजाधमकीच दिली असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनदेताना वाढीव पेन्शन नाहीतर सत्ताधारी भाजपला मतदान नाही अशा घोषणाही दिल्या.यावेळी रायगडजिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण अंबुर्ले, उपाध्यक्ष दिलीप मेथा,सचिव श्रीराम वलवनकर, खजिनदार किशोर टमके, विजयकुमार कदम,अशोक बडे आदी कार्यकारिणी सदस्यसह जिल्ह्यातील 
ई पी एस ९५ पेन्शन धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.