एका जख्मी नर चितळाचा मृत्यू. (आपसी लढाईत जखमी झाल्याची शक्यता, तळोधी बा. वन परिक्षेत्रातील घटना.)

60
एका जख्मी नर चितळाचा मृत्यू. (आपसी लढाईत जखमी झाल्याची शक्यता, तळोधी बा. वन परिक्षेत्रातील घटना.)

एका जख्मी नर चितळाचा मृत्यू.
(आपसी लढाईत जखमी झाल्याची शक्यता, तळोधी बा. वन परिक्षेत्रातील घटना.)

एका जख्मी नर चितळाचा मृत्यू. (आपसी लढाईत जखमी झाल्याची शक्यता, तळोधी बा. वन परिक्षेत्रातील घटना.)

अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8275553131

ब्रम्हपुरी :- ब्रह्मपुरी वन विभाग ब्रम्हपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिटातील हस्तानपूर गावालगत आज सकाळी एक जखमी नर चितळ एका शेतात असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. त्याची माहिती तात्काळ स्वाब संस्थेला देण्यात आली. माहिती मिळतात स्वाब संस्थेने वन विभागाला माहिती देऊन घटनास्थळी भेट दिली त्यावेळेस जखमी अवस्थेत असलेला नर चितळाचा हा उपचारापूर्वीच काही वेळातच मृत्यू झाला. यावेळी अरविंद माने क्षेत्र सहाय्यक तळोधी बाळापुर , पंडित मेकेवार वनरक्षक आलेवाही बीट यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. चित्तळाच्या शरीरावरील जखमा व तुटलेला सिंग यावरून आपसी लढाईतच हा नर चितळ जख्मी झाल्यामुळे याचा मृत्यू असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये आणल्यानंतर एच.बी.बनाईत पशुवैद्यकीय अधिकारी अ.का. तळोधी बा. यांनी शव विच्छेदन केले व नंतर चितळाला जाळण्यात आले.
यावेळी अरूप कन्नमवार वनपरिक्षेत्र अधिकारी तळोधी बा, राजेंद्र भरने वनरक्षक तळोधी, यश कायरकर अध्यक्ष स्वाब संस्था, सदस्य व सर्पमित्र जीवेश सयाम, शुभम निकेशर, नितीन भेंडाळे, गिरीधर निकुरे, हे स्वाब संस्थेचे सदस्य, देवेंद्र ऊईके ,पेंदाम आलेवाही वन चौकीदार, व वन मजूर उपस्थित होते.