बजाज चंद्रपूर पॉलिटेक्नीक चंद्रपूर येथे पर्सनालीटी डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

81

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 8 फेब्रुवारी
सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालित बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन, चंद्रपूर च्या वतीने पर्सनालीटी डेव्हलपमेंट या विषयावर मंगळवारी, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता सेमिनार आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन करून मां सरस्वती व संस्थेच्या प्रेरणास्त्रोत यशोधरा बजाज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. मानस रामटेके यांचे स्वागत प्राचार्य एस. ई. ठोंबरे यांनी केले. प्रा. मानस रामटेके यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विशेषकरून विद्यार्थी दशेत पर्सनालीटी डेव्हलपमेंटचे महत्व सांगितले.
या कार्यक्रमाला मायनिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एम. एम. डांगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. पि. आर. मालखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोहेल शेख यांनी प्रयत्न केले.