बामनी प्रोटीन प्रा. लि. कंपनीद्वारे परीसरात जलप्रदूषण • राजेश बेले यांचा आरोप

61
बामनी प्रोटीन प्रा. लि. कंपनीद्वारे परीसरात जलप्रदूषण • राजेश बेले यांचा आरोप

बामनी प्रोटीन प्रा. लि. कंपनीद्वारे परीसरात जलप्रदूषण

• राजेश बेले यांचा आरोप

बामनी प्रोटीन प्रा. लि. कंपनीद्वारे परीसरात जलप्रदूषण • राजेश बेले यांचा आरोप

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 8 फेब्रूवारी
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा तालुक्यातील बामनी प्रोटीन प्रा. लि. कंपनीद्वारे घातक रासायनिक द्रव्य कंपनीलगतच्या नाल्यामध्ये सोडले जात असल्याने तेथे जलप्रदूषण होत असल्याचा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केला आहे. याबाबत बेले यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांना पत्राद्वारे तक्रार केली आहे.

या कंपनीद्वारे वारंवार घातक रासायनिक द्रव्य पर्यावरणात सोडल्याबद्दल संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने याबाबत वारंवार तक्रार केली आहे, परंतु प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. कंपनीच्या घानीच्या दुर्गंधीमुळे मनुष्य, जलचर, प्राणी आणि पक्ष्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.

बेले यांनी दिलेल्या पत्रात तक्रारीत म्हटले की, बामनी प्रोटीन प्रा. लि. कंपनीवर तात्काळ कारवाई करुन कंपनी मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. योग्य ती कार्यवाही न झाल्यास भविष्यात संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था याबाबत तीव्र आंदोलन करेल असा इशारा बेले यांच्यातर्फे प्रशासनास देण्यात आला.