नेरळ येथे रात्रीची नाकेबंदी/गस्त ठरली फायदेशीर; चोरी होण्याआधी नेरळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

58
नेरळ येथे रात्रीची नाकेबंदी/गस्त ठरली फायदेशीर; चोरी होण्याआधी नेरळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नेरळ येथे रात्रीची नाकेबंदी/गस्त ठरली फायदेशीर;
चोरी होण्याआधी नेरळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नेरळ येथे रात्रीची नाकेबंदी/गस्त ठरली फायदेशीर; चोरी होण्याआधी नेरळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

नेरळ;-नेरळ पोलीस ठाणे हद्दीत अलीकडच्या काळामध्ये चोरी व घरफोडी यासारख्या गुन्ह्यांची वाढ होत असल्यामुळे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी स्वतःहून हजर राहत रात्रीची गस्त वाढून ठीक ठिकाणी नाका बंदी चालू केल्याचे दिसत आहे. दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री २:४५ च्या सुमारास नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शेलु येथिल रेल्वे स्टेशनच्या जवळील आदिनाथ कन्स्ट्रक्शन या बिल्डिंग जवळ दोन अनोळखी इसम अंधारात लपून तसेच आपले अस्तित्व लपून चोरी अगर घरफोडी या सारखे गुन्हे करण्याच्या इराद्याने संशयितरित्या दिसले म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

कर्त्याव्यावर असणारे पोलिस हवलदार देवेंद्र शिंगारे व पोलीस शिपाई प्रशांत बेले यांनी हि माहिती मोबायील वर फोन करून कर्जत विभागीय गस्तीकरिता असणारे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना सांगितली. शिवाजी ढवळे यांनी घटना स्थळी येऊन चौकशी केले असता सदर इसमान कडे त्यांचे नाव गाव व येथे येण्याचे कारण विचारले ते तर उडवा उडवीची उत्तरे असमाधानकारक असल्याने दोन्ही इसम हे चोरी अगर घरपोडी सारख्या गुन्ह्याचे कृत करण्याच्या इराद्याने आल्याची खात्री झाली म्हणून त्यांच्याविरुद्ध नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा २४/२०२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२ प्रमणे गुन्हा नोंद करण्यात आले. इसमांची नावे १) विकास मोतीराम राठोड वय ३६ वर्षे राहणार लादी नाका तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे २) संजय तोताराम सुते वय २५ वर्षे राहणार फॉरेस्ट नाका हनुमान नगर अंबरनाथ जिल्हा ठाणे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनखाली पो.हवालदार राजाराम पिंगळे करीत आहेत.

नेरळ नागरिकांन कडून तसेच पोलीस प्रशासनाकडून पो.हवालदार ९९० देवेंद्र शिंनगारे, पो.शी.१७२३ प्रशांत बेले यांचे कौतुक होत आहे व प्रभारी अधिकारी श्री. शिवाजी ढवळे यांच्या पोलीस दलातील अप्रतीम गुन्ह्यांची उकल करणे व गुन्हे घडू नये म्हणून आधीच खबरदारी घेणे मोलाचे ठरत आहे अशी चर्चा सर्व स्तरावरून होत आहे.