ड्रायवर चे नियंत्रण सुटल्याने तीन महिलेचा जागीच मृत्यू

48
ड्रायवर चे नियंत्रण सुटल्याने तीन महिलेचा जागीच मृत्यू

ड्रायवर चे नियंत्रण सुटल्याने तीन महिलेचा जागीच मृत्यू

ड्रायवर चे नियंत्रण सुटल्याने तीन महिलेचा जागीच मृत्यू

त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953

उमरेड.उमरेड तालुक्यातील शिर्सी शिवारात चना कापण्यासाठी महिला मजूर आले असता ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व सालेभट्टी जवळ 3 मजूर ठार झाले तर 15 जण जखमी झाल्याची घटना दी.8 फरवरी रात्रीच्या 8 वाजताच्या सुमारात घडली. सदरच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.एम एच 33 A 1977 टाटा सुमो अठरा मजुरांना घेऊन आपल्या गावाला खरबी माहेर तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर कडे जात असताना सालेभट्टी जवळ ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने टाटा सुमने तीन पलट्या घेतल्या. यात तीन महिला जागीच मृत्यू पावल्या नामे रत्नमाला मेश्राम , इंदिरा महाजन , रसिका बागडे , घटनास्थळी मरण पावल्या आहे. तर तन्वी मेश्राम ,दुर्गा अडकिने ,संगीता अडकीने , विना अडकिणे ,सोनाबाई सिदुदूके , संद्या बागडे ,सरिता नागपुरे , मनोरमा मेश्राम , सावित्री अधकिने , राजश्री मेश्राम , बेबी मेश्राम ,जनाबाई बावणे , अश्विनी बागडे ,शालू गौतम , तर ड्राइवर शंकर प्रभाकर मसराम , रा जांभूळघाट हे जखमी झाले. असून दोन मजुरांची हालत नाजूक असल्याने सांगण्यात येत आहे. जखमी रुग्णांना नागपूर शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले. सदर प्रकरणासाठी तपास ठाणेदार अजित कदम पोलीस अंमलदार कुणाल ठाकूर करीत आहे.