उच्च शिक्षीत तरूणच झाले दुचाकी चोर • स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

58
उच्च शिक्षीत तरूणच झाले दुचाकी चोर • स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

उच्च शिक्षीत तरूणच झाले दुचाकी चोर

• स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

उच्च शिक्षीत तरूणच झाले दुचाकी चोर • स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 10 फेब्रुवारी
चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक महेश कोंडावार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथक तयार करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या पथकाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी चोरीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शोध मोहीम राबवीत असतांना एक इसम विना कागदपत्राची मोटारसायकल विक्री करण्याकरीता आला आहे अशा गोपनिय माहितीच्या आधारे जिल्हा स्टेडिअम येथे सापळा रचून दुचाकी चोर आरोपी नामे आशिष रहांगडाले, वय 25 वर्ष, रा. अष्टभुजा वार्ड, रमाबाई नगर, एकता चौक, चंद्रपुर याला ताब्यात घेवुन त्याच्याकडुन चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलपैकी तीन मोटारसायकल या पोस्टे. रामनगर हद्दितील व एक मोटारसायकल ही चामोर्शी येथील आहे. जप्त मोटारसायकल व आरोपीला पुढिल तपासासाठी पोस्टे. रामनगर येथे ताब्यात घेण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांच्या नेतृत्वात, पो.उप.नि.विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ. नितीन रायपुरे यांनी केली.