माणगांव: रत्नाकर (बंड्या) उभारे यांचा राष्ट्रवादी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगांव :- माणगांव नगरपंचायतीमधील राजकारणामध्ये प्रत्येक दिवस एक नवीन घडामोड घेऊन येत आहे. दोन तीन दिवस आधी नगरपंचायतीत सगळे पक्ष एकत्र येत आश्चर्याचा धक्का देतात काय? आणि आज राष्ट्रवादी शिवसेना पक्ष महायुतीत सोबत असून सत्तेत सोबत असून देखील हा पक्ष प्रवेश तटकरेंना दे धक्काचं समजला जात आहे. शिवसेना पक्ष प्रतोद आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.
रत्नाकर उभारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश म्हणजे माणगांव नगरपंचायतीचा विचार केला तर शिवसेनेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मानला जात आहे. नगरपंचायती मधील शिवसेनेचे संख्याबळ आता वाढणार आहे. माणगांव शहरातील आनंद यादव यांच्या नंतर राष्ट्रवादी पक्षातील दुसरे मोठे नाव कोणते मानले जात होते तर रत्नाकर उभारे यांचे नाव होते. पण त्यांच्या या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला चांगलाच फटका बसला आहे. पक्षाची ताकद माणगांव शहरातून कमी होत आहे.
आधी प्रभाकर उभारे यांचे चिरंजीव परेश उभारे याचा शिवसेना ऊ.बा.ठा गटात प्रवेश आणि आज रत्नाकर उभारे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश यातून तटकरें पासून उभारे कुटुंब लांब गेलेलं दिसत आहे. याचा परिणाम फक्त माणगांव शहरापुरता मर्यादित नसून उभारे यांचे गाव दाखणे असल्याने आता दाखणे ग्रामपंचायतीमधून राष्ट्रवादी पक्ष जवळपास हद्दपार झाला आहे.
यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अरुण चाळके, शिवसेना नेते राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, उप नगराध्यक्ष राजेश मेहता शिवसेनेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.