मौलाना मुफ्ती अजहरी यांची सुटका करा अटकेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

मौलाना मुफ्ती अजहरी यांची सुटका करा

अटकेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

मौलाना मुफ्ती अजहरी यांची सुटका करा अटकेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.9923358970

कोरपना :- मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांच्या वर खोटा गुन्हादाखल करून मुंबईस्थित केलेल्या अटकेच्या विरोधात कोरपना येथील मुस्लिम सकल समाजाकडून तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले काही दिवसापूर्वी मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांच्या गुजरात येथील बयान वरून गुजरात जुनागड येथील ए.टी.एस ने बेकायदेशीर अटक केली आहे १ जुनी शायरी- हमसे जो उलझते हो अभी तो करबला का आखरी मैदान बाकी है, कुछ देर कि खामोशी है,फिर वो समा आयेगा ,आज कुत्तो का वक्त है कल हमारा दौर आयेगा – हा शेर इजराईल येथिल बेगुन्हा लहान मुले-महिला यांच्या वर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात म्हटलेलं आहे यामध्ये भारतीय गंगा,जमुना, तहेजीब वंशाच्या कोणत्याही जाती-धर्म व्यक्ती विषयी कुठलाही शब्द उच्चारलेला नाही मात्र शासन हेतू पुरस्सर धर्मा-धर्मा मध्ये टेड निर्माण करण्यासाठी मौलाना वर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे हि बेकायदेशीर व घटनाबाह्य बाब आहे गुजरात पोलिसांनी महाराष्ट्रातून त्यांना आपल्या ताब्यात घेवून गुजरात येथे वेगवेगळ्या आरोपात त्यांना अडकविण्याचा षडयंत्र रचल्या जात आहे मौलाना वर झालेला अन्याय व नोंदविलेले गुन्हे रद्द करण्यात यावे त्याची तात्काळ सुटका करावी व सबंधित अधिकार्याला निलंबित करण्यात यावे भारतीय संविधान घटनेने अभिव्यक्ती, स्वतंत्र, भावना व्यक्त करण्याचे अधिकार दिले आहे या शेर-शायरी मुळे कोणाच्याही धार्मिक, सामाजिक अथवा व्ययक्तिक भावना दुखविल्या जात नाही म्हणून कोरपना येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपतिना निवेदन देवून संबंधित घटनेचा निषेध नोंदविण्यात आला या प्रसंगी सामाजिक चळवळीचे नेते स.आबिद अली,मौलाना शेर खान,मौलाना अजहर मस्जिद कमेटीचे असरार अली ,शेख शब्बीर,अब्दुल रहेमान,मोबीन बेग,मोहबत खान,शहेबाज अली, नहीम लुंडा, सुहेल कुरेशी, इमरान कुरेशी, शेख रसूल, बशीर काजी नगर सेवक मोहम्मद शेख, शेख मुस्ताक ,जावेद अली,साहिल शेख यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here