शिक्षक आमदार अडबाले यांनी उपोषण मंडपास भेट घेत जानून घेतल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 12.फेब्रुवारी
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या समस्या आर्थिक समस्या सन २०१७-१८ पासून प्रलंबित असल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी या संघटनेने ६ फेब्रुवारी पासून जिल्हा परिषद कार्यालय चंद्रपूर समोर उपोषण सुरु केले आहे.
या आंदोलनाची नोटीस २५ जानेवारी २०२४ ला संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना देण्यात आली होती. शिक्षकांची गटविमाप्रकरणे सन २०१७-१८ पासून काढण्यात आलेली नाही. जे सेवानिवृत्त कर्मचारी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे येऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या भेट घेतात त्यांचीच प्रकाराने काढण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने आमदार साहेबांना सांगण्यात आले. मागील वर्षभरापासून उपदान व अंशराशीकरण ची अंदाजे प्रत्येक शिक्षकांची २५ ते ३० लाख रुपये जिल्हा परिषद कडे थकीत आहे. दरवर्षी ५ सप्टेंबर ला शिक्षक दिनी जिल्हा आदर्श पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात येतो. त्या शिक्षकांना एक ज्यादा वेतन वाढ देण्यात आली होती. सेवानिवृत्ती प्रसंगी त्यांची रक्कम वसुल करण्यात येते, हि बाब अन्यायकारक आहे. ३० जून ला निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक काल्पनिक वेतन वाढ देणे बंधनकारक असते. माहे सप्टेंबर २०२३ पासून जवळपास ५० शिक्षकांची सदर प्रकरणे अद्याप जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्रलंबित आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद कडून सेवानिवृत्त झाल्यानंतर सत्कार करण्यात येतो. त्या प्रसंगी पी. पी. ओ. देण्यात यावा, अशी संघटनेची मागणी आहे.
याशिवाय इतरही समस्या प्रलंबित आहे. त्या आमदार अडबाले यांनी उपोषण मंडपात भेट देऊन जाणून घेतल्या आणि चर्चा केली. यावेळी उपस्थित संघटनेचे प्रतिनिधी दीपक वरेकर, मनोहर बकाने, हेमंत वागदरकर, प्रभाकर देशेवार, भाऊराव घुगुल, विजय वासाडे, रामचंद्र नागापुरे, भास्कर गाडगे व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.