कोकण इतिहास परिषदेचे तेरावे
राष्ट्रीय अधिवेशन संपन्न.
✍️सनिल इंगावले✍️
रोहा तालुका प्रतिनिधी
📞९९२२२०७२०५ 📞
रोहा :-कोकण इतिहास परिषदेचे तेरावे एक दिवशीय राष्ट्रीय अधिवेशन शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी कणकवली कॉलेज कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा येथे पार पडले. या परिषदेस उद्घाटक म्हणून डॉ. वि. ल. धारूरकर ( माजी कुलगुरू त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठ) म्हणुन लाभले. या कार्यक्रमात मा. प्रकाश देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर इतिहास अभ्यासक संशोधक महेश तेंडुलकर यांच्या पुस्तकास उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला. मागील वर्षीच्या सर्वोत्कृष्ट संशोधन पेपर म्हणून प्रा. रेखा गोरे आणि श्री विवेक चारी यांची निवड होऊन त्यांना सत्कार करून पारितोषिक देण्यात आले. परिषदेत प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासावर अनेक संशोधनपर शोध निबंध सादर करण्यात आले. देवगड तालुक्यातील गेल्या चार वर्षात नव्याने उजेडात आलेल्या कातळशिल्पांची भारतियविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर आणि त्यांच्या सहकऱ्यांनी उभारलेली प्रदर्शनी हे अधिवेशनातले विशेष आकर्षण ठरले. अनेकांनी या प्रदर्शनीची विशेष प्रशंसा केली. परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे डॉ. प्रा. सोमनाथ कदम आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली. परिषद यशस्वी करण्यासाठी कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर, कार्यवाह प्रा. विद्या प्रभू आणि इतर पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. कशेळीचा कनकादित्य या विषयावर डॉ. अंजय धनावडे यांनी शोधनिबंध सादर केला. यात कनकादित्याची मूर्ती शिलाहारकाळाच्याही आधीची म्हणजे बदामी चालुक्य काळातील असल्याचे दाखले देत.आजचे आडिवरे म्हणजे सातव्या शतकातील प्राचीन काळातील आदित्यवाड नावाचे स्थान असल्याचे दाखवून दिले आहे.