अल्ट्राटेक सिमेंटच्या मार्कागोडी लेटेराइट खाण प्रकल्पाला पर्यावरणीय परवानगी नाकारा : राजेश बेले

55

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 13 फेब्रुवारी
मेसर्स अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या मार्कागोडी लेटेराइट खाण प्रकल्पाला पर्यावरणीय परवानगी नाकारण्याची मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्राद्वारे केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणाची पातळी दिवसागणिक वाढत आहे, त्यामुळे नवीन प्रदूषणकारी उद्योगांना परवानगी देऊ नये, असे बेले यांनी म्हटले आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती केली आहे की, प्रदूषण करणारे उद्योग बंद करून जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध वातावरण उपलब्ध करून द्यावे. अल्ट्राटेक सिमेंट आणि माणिकगड सिमेंट वर्क्स या दोन्ही कंपन्यांमुळे वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये दमा, हृदयविकार, डोळ्यांचे आजार, त्वचारोग, क्षयरोग आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच, शेतजमिनी आणि पिकांचेही नुकसान होत आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली पर्यावरण जनसुनावनी रद्द करण्याची आणि प्रकल्पाला पर्यावरणीय परवानगी नाकारण्याची मागणी बेले यांनी केली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार नोटीसा बजावल्या असल्या तरीही कंपन्यांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, असा आरोप बेले यांनी केला आहे.
प्रकल्पाचा पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) अहवाल खोटा आहे आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पर्यावरण जनसुनवायी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.