वरोरा येथे रेती साठ्यावर एसडीपीओंचा छापा
• जप्त रेती साठा देखरेखीखाली
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
वरोरा : 13 फेब्रुवारी
वरोरा शहरालगत असलेल्या घनश्याम नगरीत पडीत जागेवर असलेल्या रेतीच्या साठ्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी नयोनी साटम यांनी छापा टाकून यंत्र व सामुग्रीसह अंदाजे 60 ब्रास रेतीचा साठा जप्त केला असून, पुढील कारवाईसाठी महसूल विभागाकडे सुपूर्द केला.
वरोडा शहरालगत असलेल्या घनश्याम नगर येथे एका पडीत जागेत मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा असल्याची माहिती नयोनी साटम यांना मिळाली. माहिती मिळताच साटम यांनी पोलिस कर्मचार्यांसह घनश्याम नगर येथे छापा टाकला. या दरम्यान अंदाजे 60 ब्रास रेतीचा साठा आढळून आला. या रेतीच्या साठयाजवळ जेसीबी व हायवा उभी असल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली. पुढील कारवाईसाठी तहसीलदारांना अहवाल पाठविण्यात आला. त्या आधारे तहसीलदारांनी पथक तयार करत घनश्याम नगर येथील रेतीसाठा, जेसीबी व 2 हायवा ट्रक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात देखरेखीत ठेवण्यात आले आहे.